जाहिराती बंद x
BoXOfficeबॉलिवुड चक्कर

लवकर येणारे टॉप 10 बॉलिवूड चित्रपट | Upcoming Bollywood Movies 2023 & 2024

×

लवकर येणारे टॉप 10 बॉलिवूड चित्रपट | Upcoming Bollywood Movies 2023 & 2024

Share this article

लवकर येणार हे १० बॉलीवूड चित्रपट

नमस्कार मंडळी आपण सर्व बॉलीवूडचे चित्रपट पाहण्यासाठी नेहमी अति उत्सुक असतो. बॉलीवूड हा उद्योग दिवसान दिवस मोठाच होत चालला आहे. खूप सारे युवक मुंबईमध्ये बॉलीवूड पोहोचण्याची इच्छा घेऊन येतात परंतु खूप कमी यश प्राप्त करतात. बॉलीवूड मध्ये चित्रपट भेटायला खूप कठीण परिश्रम करावे लागते. बॉलीवूड मध्ये दर आठवड्यात नवीन चित्रपट समोर येतात. आपल्याला नेहमीच फर्स्ट डे फर्स्ट शो असं पाहण्याची उत्सुकता असते. कइक वेळेस आपल्याला या नवीन चित्रपटाचे आगमनाची माहिती उशिरा कळते कीवा चित्रपटाची प्रदर्शनी समाप्त झालेली असते. आज आम्ही तुमच्यासाठी लवकर येणारे दहा बॉलीवूड चित्रपटाची ओळख करून देणार आहे तर नक्की वाचा आणि या चित्रपटाला हाजरी लावा.

आदीपुरुष

आदीपुरुष हा चित्रपट १६ जून ला बॉलीवूड मध्ये धमाल करायला येत आहे. आदीपुरुष हा चित्रपट भारतीय महाकाव्य रामायण वर आधारित आहे.

जाहिराती
Ads

या चित्रपटात आपल्याला प्रभासचंद्र राजू आणि कीर्ती सेनन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपटाला बॉलीवूड मध्ये सर्वात मोठ्या खर्चांचा चित्रपट समजले जात आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन तानाजी दिग्दर्शक ओम राऊत यांच्या द्वारे केले आहे. पहिले आदिपुरुष 12 जानेवारी ला प्रदर्शित होण्याची अपेक्षा होती, पण ट्रेलर प्रदर्शित केल्यानंतर त्याचे विरोध झाले आणि तारीख पुढील गेली. हा चित्रपट तेलुगु आणि हिंदी द्विभाषेत चित्रण केले गेले आहे. चित्रपटाचे वी एफ एक्स खूप उत्कृष्टपणे चित्रित केले गेले आहे. या आदोगर तान्हाजी चित्रपटांत खलनायक याच्या भूमिकेत होता तसेच या चित्रपटात सुद्धा आपल्याला सैफ अली खान खलनायक च्या भूमिकेत आहेत प्रदर्शित होणार आहे.

एनिमल

एनिमल या चित्रपटाचे टीजर 11 जून ला प्रदर्शित झाले. या चित्रपटात आपण रणबिर कपूर ला गॅंगस्टर च्या भूमिकेत बघू शकतो. या चित्रपटाचे दिग्दर्शक या अदोगर कबीर सिंग चित्रपटामध्ये  संदीप रेड्डी द्वारा दिग्दर्शन केल आहे. या चित्रपटात आपल्याला भरपूर ॲक्शन आणि धक्कादायक थ्रिलर दिसणार आहे. या चित्रपटांमध्ये रणबिर कपूर आणि रश्मीका मंदाना यांची गोड़ जोडी दिसणार आहे त्याच्यासोबत अनिल कपूर आणि बॉबी देवल यांची मुख्य भूमिका असणार आहे. या चित्रपटाचे उत्पादन टी सिरीज, भद्रकाली पिक्चर्स आणि सिने वन स्टुडिओज द्वारा केले गेले आहे.

रॉकी और रानी की प्रेम कहानी

रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट भरपूर चर्चेत आहे. करण जोहरने त्याच्या वाढदिवस निमित्त चित्रपटाचे नवीन पोस्टर सादर केले. या चित्रपटात आपल्याला परत एकदा रणवीर सिंग आणि आलिया भट ची गोड जोडी दिसणार आहे. रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट घरगुती नाटक वर आधारित आहे सोबत या चित्रपटात रोमान्स तडका ही आहे.

सूत्रांच्या अनुसार चित्रपटाची कथा प्रदर्शित होण्याआधीच लीक झाली आहे. या चित्रपटाचे उत्पादन धर्मा प्रोडक्शन द्वारा केले गेले आहे. चित्रपटात जया बच्चन, शबाना आजमी आणि धर्मेंद्र सारख्या भरपूर मुख्य कलाकार आहे.

मैदान

मैदान हा चित्रपट खेळ जीवन चरित्रात्मक कथा आहे. हा चित्रपट भारतीय फुटबॉल च्या सुवर्ण युगाची आहे (१९५२-६२). हा चित्रपट फुटबॉल संचालक सय्यद अब्दुल रहीम यांच्या जीवन कथेवर आधारित आहे. या महान व्यक्तीने १३ वर्ष भारतीय फुटबॉल मध्ये व्यवस्थापक राहिले आणि आधुनिक भार उचल्ले. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित शर्मा द्वारा द्वारा केले आहे.

ह्या चित्रपटात अजय देवगन, प्रियमनी, रुद्रनिल घोष, अभिनय जयसिंग आणि गजराज असे खिलाडी आणि कोच सय्यद अब्दुल रहीम दिसेल. हा चित्रपट लवकरच 23 जूनला आपल्या भेटीला प्रदर्शित होणार आहे. मैदान चित्रपट हिंदी, तामिळ आणि मल्याळम भाषा मध्ये प्रकाशित होणार आहे‌. फिल्मचे निर्माण बोनी कपूर आणि झि स्टुडिओज द्वारा केले गेले आहे.

अजमेर 92

अजमेर 92 नाव राजनैतिक आणि चित्रपटक्षेत्रात खूप गाजले आहे. हा चित्रपट लवकरच १४ जुलै ला चित्रपटग्रुहात प्रकाशित होत आहे. हा चित्रपट पुष्पेन्द्र सिंह द्वारा दिग्दर्शित केला गेला आहे. चित्रपटाचे संगीत पार्थ शाखा दास काभी द्वारा दिले आहे. हा चित्रपट १९९२ मध्ये झालेल्या अजमेर घटनेवर आधारित आहे. चित्रपटात अजमेरच्या स्कूल आणि कॉलेज मधल्या मुलींसोबत झालेली घटना दर्शवली गेली आहे. हा चित्रपट एक सत्य घटना वर आधारित आहे. या चित्रपटाची कठोर कहानी तुमच्या ध्येयाला हालवून देईल. खूप सारे गटांनी या चित्रपटाचा प्रतिबंध ही लागू करण्याची मागणी केली आहे.

सत्यप्रेम की कथा

सत्य प्रेम की कथा चित्रपट तुमच्या भेटीला २९ जूनला येत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन समीर विद्वान्स द्वारा केले गेले आहे. भुलभुलय्या २ च्या यशानंतर कार्तिक आर्यन आणि कियारा आडवाणी ही गोड जोडी परत एकदा पडद्यावर दिसणार आहे. या चित्रपटाला नडियाड वाला ग्रँडसम एंटरटेनमेंट आणि नाम पिक्चर द्वारा उत्पादित केला आहे. चित्रपटात आपल्याला कियारा अडवाणी आणि कार्तिक आर्यन यांची प्रेम कहानी आणि त्याच्या नंतरचे दुःख बघायला भेटणार आहे.

ओ एम जी २

ओ एम जी २ हा व्यंग्यात्मक चित्रपट 11 ऑगस्टला चित्रपटगृहात आपल्याला भेटायला येत आहे. चित्रपटाचा दिग्दर्शन अमित राय यांच्याद्वारे केले आहे. ओ एम जी (ओ माय गॉड) हा चित्रपट अध्यात्मिक ज्ञानवर आणि भारतीय शिक्षण प्रणालीवर आधारित आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी, यामी गौतम, अरुण गोविल आणि अमीर नायक असे कलाकार दिसणार आहे. ओ एम जी २ चे पोस्टर अक्षय कुमार सोशल मीडियावर प्रदर्शित केले आणि लिहिले आम्ही येतोय व, तुम्ही पण या. चित्रपटात आपण अक्षय कुमारला शंकरच्या भूमिकेत पाहू शकतो. हे पाहून प्रेक्षक आणखी उत्सुक झाले आहे.

गदर 2

‘गदर 2: द कथा कंटिन्यूज’ हा चित्रपट लवकरच 11 ऑगस्ट ला चित्रपट गृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अनिल शर्मा यांच्याद्वारे केले आहे.

हा चित्रपट ‘गदर एक प्रेम कथा’ या चित्रपटाचे दुसरे भाग आहे. या चित्रपटात अमिषा पटेल व, सनी देओल आणि उत्कृष्ट शर्मा यांची मुख्य भूमिका दिसणार आहे.

चित्रपटाची चित्रण एक डिसेंबर रोजी पालमपूर हिमाचल प्रदेश मध्ये सुरू करण्यात आले होते. या चित्रपटाची घोषणा ओक्टोबर २०२१ मध्ये केली होती तेव्हापासून प्रेक्षक या चित्रपटासाठी उत्सुक झाली होती.

धूनकी

धूनकी हा चित्रपटाला प्रदर्शित होयला भरपूर वेळ आहे परंतु या चित्रपटाचे पोस्टरनी बॉलीवूड मध्ये धमाल केली आहे. चित्रपट 22 डिसेंबर 2023 ला चित्रपटगृहात येणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी ने केले आहे. या चित्रपटात आपल्याला शाहरुख खान, तापसी पन्नू आणि बोमा निराणी सारखी मुख्य कलाकार दिसणार आहे. शाहरुख खानचा सर्वात असामान्य चित्रपट म्हणले जात आहे.

1920

1920 हॉरर ऑफ द हार्ट चित्रपट लवकरच 23 जून 2023 ला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात अविका गोर आणि राहुल देव यांची मुख्य भूमिका दिसणार आहे. हा चित्रपट भयपट घटने वर आधारित आहे. या चित्रपटाची लेखणी महेश भट ने केली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन विक्रम भट यांनी केले आहे. चित्रपट मोशन पिक्चर कॅपिटल च्या ध्वजाखाली प्रदर्शित होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत