जाहिराती बंद x
Marathi MoviesOTT Newsबॉलिवुड चक्कर

Bloody Daddy In Marathi | ब्लडी डॅडी आता मराठीत सुध्दा पाहा

×

Bloody Daddy In Marathi | ब्लडी डॅडी आता मराठीत सुध्दा पाहा

Share this article

ब्लडी डॅडी हा चित्रपट ९ जून २०२३ मध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास जफार यांच्या द्वारा केले आहे. चित्रपटाची कहाणी ही आदित्य बसू आणि सिद्धार्थ गरिमा यांनी लिहिली आहे. चित्रपटाचे उत्पादन जिओ स्टुडिओ द्वारा केले आहे. या चित्रपटात आपल्याला शाहिद कपूर, संजय कपूर,  दियाणा पेन्टी, राजीव खंडेलवाल आणि अंकुर भाटिया यांचे प्रमुख भूमिका दिसणार आहे. हा चित्रपट फ्रेंच चित्रपट स्लीपलेस नाईट २०११ वर आधारित आहे, ज्याचा रिमेक कमल हसन द्वारा ठुंगा वनम या चित्रपटात केला होता. ज्या प्रेक्षकांनी ठूंगा वनम रीमेक पाहिला त्यांना या चित्रपटात काही नवीन नाही दिसणार.

तीन वर्षानंतर अली अब्बास जफर यांनी परत चित्रपट क्षेत्रात पाऊल ठेवले आहे, त्यांची शेवटची चित्रपट भारत आहे. यावेळेस हे आपल्यासाठी ब्लडी डॅडी अनोखा चित्रपट घेऊन आले आहे, याच्यासोबत ते आणखी तीन चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म साठी हजर करनार आहे. प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहिला नंतर या चित्रपटाला मोठ्या सिनेमाचे दर्जा दिले आहे. जेव्हा दिग्दर्शकाला या चित्रपटाचे मोठ्या पडद्यावर प्रदर्शन बद्दल विचारले तेव्हा जफर बोलले हा चित्रपट भरपूर रक्त, बंदूक आणि ड्रग ने समावेश आहे, म्हणून हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होन्या योग्य नाही आणखी कारण देता सांगितले की चित्रपटात संगीताची अनुभूतीची कमी आहे. परंतु या चित्रपटाचा दुसरा भाग मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

जाहिराती
Ads

Where to watch Bloody Daddy movie ?

ब्लडी डॅडी हा चित्रपट तुम्ही जिओ सिनेमा हा ॲप डाऊनलोड करून फुकट पाहू शकता.

चित्रपटाचे नाव  ब्लडी डॅडी 
OTT प्लॅटफॉर्म जिओ सिनेमा
OTT प्रदर्शित तारीख 09 जून 2023
 Technical  डिटेल्स  रिझलेशन:- 480p,720p,1080p, 1440p,2160p [ 4K ]

ऑडिओ :- DDP5.1[ Dolby Digital ] ( 640kbps)

दिग्दर्शक अली अब्बास जफर
 मूळ ऑडिओ हिंदी
तारांकित शाहिद कपूर आणि अंकुर भाटिया
सिनेमॅटोग्राफी मार्सिन लास्काविक
संपादक स्टीव्हन बर्नार्ड
चित्रपट उद्योग बॉलीवूड
CBFC U\A
शैली  ऍक्शन, ड्रामा, थ्रिलर
डब्बड ( अनुवाद )  कन्नड,मराठी,तेलुगू,तमिळ,मल्याळम, बंगाली

संपूर्णपणे हा चित्रपट एक आक्रमक थ्रिलर आहे. या चित्रपटात शाहिद कपूरची भूमिका अगदी धमाल आहे.

चित्रपटाचा पहिला तास खूप मनोरंजक आहे आणि काही मजेदार भाग पण आहेत. पन दुसरा भाग अप्रतिम आहे. चित्रपटात क्रिया चित्रन शून्य आहे. प्रेक्षकांच्या अनुसार शाहिद कपूरच चित्रण चित्रपटाला शोभा देत आहे. जंगली प्राणी सोडल्यावर चित्रपटाचा क्रिया भाग अतिशय उत्कृष्ट वाटतो. शाहिद कपूरच चित्रन लहान आहे परंतु अतिशय अद्भुत आहे त्यांची भूमिका आज पर्यंत प्रेक्षकांच्या मनात आहे. अभिनेता द्वारा चित्रपटात खूप हस्यात्मक दृश्य प्रदर्शित केले आहे. सगळ्यात हस्यात्मक नेपाली हॉटेल स्टाफ सह दृश्य आहे. ब्लडी डॅडी हा चित्रपट किती जरी धमाल असला तरी पारिवारिक चित्रपट नाही आहे. या चित्रपटात भरपूर भद्रभाष्याचा प्रयोग केला आहे, ही भाषा मनोरंजनासाठी जरी वापरली असेल तरीही घरगुती नाही आहे.

डियाना पेंटी चे अभिनय पण खूप उत्कृष्ट आहे. क्रिया भाग चित्रपटात कमी आहे परंतु अतिशय छान तयार केले आहे. शाहिद कपूर आणि राजीव खंडेलवाल यांचा तालमेल अतिशय उत्कृष्टपणे चित्रण केले आहे. चित्रपट फक्त दोन तासाचा आहे परंतु चित्रपटाची एडिटिंग खूप धमाल आहे.

शाहिद कपूर ने सुमैर या नावाचा पात्र केला आहे. चित्रपटात आपल्याला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आणि ड्रग्स बद्दल कळणार आहे. हा चित्रपट संपूर्ण ड्रग माफियांवर आधारित आहे, अली अब्बास जफर ने उत्कृष्ट असा कळस चित्रपटाला दिला आहे, कथेचा प्लॉट एकदम सरळ आणि सुटसुटीत आहे, ज्याला समजायला प्रेक्षकांना कुठलेही शास्त्र नाही लागत. परंतु अभिनयाची शैली आणि चरित्रांची खोलता अधिक असल्याची गरज आहे त्यामुळे चित्रपटाचे शेवट प्रेक्षकांना भावले नाही. शाहिद कपूरचे चित्र उत्कृष्ट जरी असले तरी तो ॲक्शन सीन मध्ये प्रेक्षकांना निराश करतो, त्याचे आगामी चित्रपट कबीर सिंग,फर्जी आणि जर्सी मधले पात्र एकसारखे व्यंगात्मक आहे, त्यामुळे शाहिद कपूरचे चित्र प्रेक्षकांच्या मनात तसेच जोडले जात आहे. शाहिद कपूर म्हटलं की प्रेक्षकांना कबीर सिंग हा आठवतो, त्यामुळे अभिनेता साठी त्या भूमिकेवर मात करून आपली नवीन भूमिकेची स्थापना करणे हा एक मोठा प्रश्न आहे. चित्रपटाच्या दोन तासात प्रेक्षकांना भरपूर थ्रिलर आणि धमाल बघायला भेटतो. आदित्य बसू आणि सिद्धार्थ करिमा चा लेखित चित्रपटाचा जोर उच्च स्वरात आरंभ होते परंतु काही वेळेस चित्रपटाचा स्वर खाली येतो आणि एक बोरिंग अनुभूती करून देतो. प्रेक्षक चित्रपटाला पूर्णरूपेने मनोरंजन करिता पाहता, परंतु जर चित्रपटाचं आरंभ धमाल असेल परंतु अंतिम कारणीभूत नसेल तर प्रेक्षकांच चित्रपटाबद्दल प्रेम कमी होते आणि प्रेक्षकांच्या अपेक्षा चित्रपटांकडून संपते.

प्रेक्षकांच्या अनुसार चित्रपटाची शेवट एवढी उचित नाही आहे, चित्रपटांमध्ये आणखी पात्रांचे खोलपर्यंत चित्रण केले पाहिजे होते, चित्रपटाचे संवाद आणखी उत्कृष्ट पणे सादर केले जाऊ शकते. या चित्रपटात ॲक्शन सीन ची मात्रा कमी आहे. खूप सार्‍या प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाचे दुसर्या भागाचा विचार असेल. अली अब्बा जफरच्या अनुसार चित्रपटाचे दुसरे भाग ह्या गोष्टीवर निर्भर करते की चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात किती जागा बनवली आहे. चित्रपटाला आज आणि उद्या प्रेम मिळून काही उपयोग नाही आहे, जर चित्रपट सहा महिने किंवा वर्षानंतर ही लोकांच्या मनात घर करते तर त्याची पुढच्या भागाची विचार करता येईल.

चित्रपटाचं ट्रेलर

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत