बाई पण भारी देवा हा जरा हटके चित्रपट लवकरच चित्रपटगृहात 30 जून 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात आपण मराठी कला आणि त्याच्या सौंदर्याची ओळख करून घेणार आहे. केदारनाथ शिंदे हे असे महान दिग्दर्शकांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या दिग्दर्शकाचे २०२३ वर्षी ‘महाराष्ट्र शाहीर’ या धमाल चित्रपटाद्वारे खूप प्रसिद्धी मिळवली आहे. चित्रपटाचे उत्पादन जिओ स्टुडिओज आणि एम व्ही बी मीडिया यांच्याद्वारे केले आहे. रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी, शिल्पा नवलकर, दीपा परब, सुचित्रा बांदेकर हे कलाकार आपल्याला चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटासाठी इतर लोकप्रिय कलाकार शरद पोंक्षे आणि श्वेता बांदेकर यांची निवड झाली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून आपण एवढे सगळे मनोरंज कलाकार सोबत पाहणार आहे.
बाई पण भारी देवा या चित्रपटाची कहाणी सहा सख्या बहिणींवर आधारित आहे. लग्न झाल्यावर एक स्त्री तिच्या सासरे मध्ये व्यस्त होते, माहेरची गोष्ट विसरून जाते परंतु जसे बोलतात रक्ताचे नाते हे अतिप्रिय असते तसंच काही आपल्याला या चित्रपटाच्या माध्यमातून दिसणार आहे. या कथेत सहा बहिणी मंगला गौर स्पर्धेत भाग घेण्यासाठी एकत्रित येतात. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी त्यांना कठीण परिस्थिती आणि लोकांच्या मानसिकताच्या सामोरी जावा लागते. या सहा बहिणी त्यांच्या अतितावर कशी मात देतात? आणि संघर्षा समोर कसे लडतात? हे प्रश्न प्रेक्षकांसाठी खूप उत्सुकताचे आहे.
OTT Update
चित्रपटाचे नाव | बाईपण भारी देवा |
OTT प्लॅटफॉर्म | जिओ सिनेमा |
OTT रिलिज तारीख | अजून निश्चीत नाही |
रिलिज तारीख | 30 जून 2023 |
दिग्दर्शक | केदार शिंदे |
इंग्रजी | मराठी |
तारांकित | रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर, दीपा चौधरी |
चित्रपट उद्योग | मराठी |
CBFC | U\A |
शैली | फॅमिली,कॉमेडी |
संगीतकार | अजय अतुल |
चालू वेळ | 156 मिनिटे |
बाई पण भारी देवा हा चित्रपट एक स्त्रीप्रधान भूमिका चा चित्रपट आहे. आपण हिंदी चित्रपटात स्त्री प्रधान भूमिका गाजवताना बघितले आहे, क्वीन, मनिकरनिका, इंग्लिश विंग्लिश, मर्दानी आणि कहानी या काही प्रसिद्ध हिंदी स्त्रीप्रधान चित्रपट आहे.
आता मराठी चित्रपटातील ही सुरुवात झाली आहे. मागच्या वर्षी झिम्मासारखा स्त्रीप्रधान चित्रपट मराठी सिनेमात खूप गाजला होता. याच्यापूर्वीही मराठी सिनेमा असे भरपूर स्त्रीप्रधान सिनेमा आलेली आहे, प्रेक्षकांनी भरपूर प्रेम या चित्रपटांना दिले आहे. आजची नारी संपूर्ण आहे आणि सफलताला प्राप्त करत आहे, त्यांची भूमिका समाजामध्ये चित्रपटाच्या माध्यमातून दाखवणे खूप गरजेचे आहे. भविष्यात भरपूर स्त्री प्रधान चित्रपट येतील याची अपेक्षा आहे. या चित्रपटांच्या माध्यमातून आपल्याला पाठीमागच्या पिढीची स्त्री आणि नव्या पिढीची स्त्री मध्ये झालेले अंतर दिसेल. या दोन पिढ्यांची अनोखे नाते हे जगासमोर आणणे गरजेचे आहे. या सोबतच समाजामध्ये भरपूर परिवर्तनाची वाटचाल होते. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसापूर्वी खूप थाटामाटात प्रदर्शित झाला प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया ही खूप छान भेटल्या, या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्याला स्वतः अशोक सराफ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित झाले. अशोक सराफ या महान कलाकाराच्या हाताने चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला. या महत्त्वाच्या सोहळ्याला दिग्दर्शक केदार शिंदे, वंदना गुप्ते, दीपा परब चौधरी, शिल्पा नवलकर, रोहणी हट्टंगडी,सुकन्या कुलकर्णी मोने, गायिका सावनी रविंद्र, संगीतकार साई-पियुष आणि या चित्रपटाची संपुर्ण “बाई पण भारी देवा” ची भन्नाट टीम उपस्थित होती.
या चित्रपटात आपल्याला नात्याचे महत्व कळणार आहे. या चित्रपटात बहिनीं मध्ये असलेल् प्रेम, माया त्यांच्या विविध व्यक्तिमत्त्वांची दर्शन होणार आहे. मंगळागौर हा खेळा बद्दल तर तुम्ही नक्की ऐकला असेल, मंगळागौर एक प्रसिद्ध महाराष्ट्रीयन महिलांचा खेळ आहे ज्यात सगळ्या महिला गोळा होतात आणि आपले खेळ आणि नृत्य प्रदर्शन करतात. या चित्रपटात मंगळागौर स्पर्धेत या सहा बहिणी एकत्र भाग घेतात आणि काही महत्त्वांच्या कारणामुळे वेगळे झालेल्या बहिणी पुन्हा एक होतात, हे बघण्यासाठी तुम्हाला ३० जूनला चित्रपटगृहात हजेरी देवा लागेल. तुम्हाला या चित्रपटात थोडासा रुसवा, फुगवा, दुख आणि हास्य सर्व काही एकत्र मिळणार आहे.
हे पण पहा : TDM 2023 Marathi Movie | Release Info,Ott Update,Box Office Collection,Song’s
या चित्रपटात तुम्हाला वेगवेगळे कलाकार दिसणार आहे. महिलांची ही कथा आपल्याला नक्कीच भरपूर काही शिकायला देणार आहे. प्रत्येकाच्या जीवनात महत्त्वाची भूमिका एक स्त्रीचे असते मग ती तुमची आई, ताई, आजी, काकी, सासू, मावशी कोणीही असू शकते, या सर्वांच्या भाव व्यक्त करणारा हा चित्रपट आहे अर्थात हा चित्रपट महिलांबद्दल जरी असला तरी हा प्रत्येक पुरुषालाही बरच काही शिकवणार आहे. ही कथा सर्वसामान्य बाईची आहे जिला आपण साधारण गृहिणी समजतो. चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे हे म्हणतात की “आपल्याकडे वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट प्रदर्शित होतात परंतू स्त्रीच्या मनाची स्थिती क्वचितच चित्रपटात दाखवली जाते” तोच विचार दिग्दर्शकाने या चित्रपटाच्या माध्यमातून सादर केला आहे. चित्रपट बघून प्रत्येक स्त्रीला असं वाटते की ही माझीच कथा आहे आणि स्वतःला मुख्य पात्राचा दर्जा देते.
चित्रपटाचा ट्रेलर 🔥
या चित्रपटाच्या माध्यमाने समाजात नारी सशक्तिकरण करण्याचे कृत्य केले आहे. दिग्दर्शकाने जिओ स्टुडिओ आणि मित्र संजय छाब्रिया यांचे मनापासून धन्यवाद दिले. बाई पण भारी देवा चित्रपट महिलांना स्वतःसाठी जगायला शिकवत आहे, म्हणून हा चित्रपट नक्की बघा, या चित्रपटातील सहा बहिणीची कहाणी अनुभवा. चित्रपटाच्या नावासारखंच चित्रपटाचे कलाकार भन्नाट आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून आपण वंदना गुप्ते, शिल्पा नवलकर, रोहिणी हट्टंगडी, सुचित्रा बांदेकर , दीपा परब असे कलाकार एकत्र पडद्यावर पाहण्याचा आनंद भेटणार आहे. बाई पण भारी देवा हा चित्रपट आणि याचे महान कलाकार आपल्या मनोरंजनासाठी 30 जून 2023 ला चित्रपटगृहात दिसणार आहे.
हे पण वाचा :: महाराष्ट्र शाहीर आता लवकरच ओटीटीवर पाहायला मिळणार जाणून घ्या | अमेझॉन प्राईम 2023