एका काळेचे मणी ही मराठी वेब सिरीज लवकरच 26 जून ला जिओ सिनेमा वर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात एक मराठी मध्यमवर्गीय कुटुंबाची हटके कथा दाखवली गेली आहे. या चित्रपटाचे निर्माण अभिनेते महेश मांजरेकर द्वारा केले आहे आणि या सोबतच चित्रपटाचे दिग्दर्शन अतुल केतकर यांच्या द्वारे केले आहे. आता आपला आवडता बिग बॉस चा प्रसिद्ध होस्ट महेश मांजरेकर ओटीटी मध्ये पाऊल पुढे टाकत आहे. प्रेक्षक या वेब सिरीज ला पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे. महेश मांजरेकर चे फॅन्स त्यांना या पहिल्या ओटीटी मराठी वेब सिरीज साठी खूप शुभेच्छा देत आहे. ओम भुतकर यांच्याद्वारे चित्रपटाचे कहाणीचे लेखन केले आहे.
या नवीन वेब सिरीज मध्ये सुपरस्टार प्रशांत दामले मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या वेब सिरीज चे मुख्य आकर्षण प्रशांत दामले ला मानले जात आहे. याच्या व्यतिरिक्त हृता दुर्गुळे, वंदना गुप्ते, पौर्णिमा मनोहर, ऋषी मनोहर, रुतुराज शिंदे इत्यादी असे प्रतिभाषाली कलाकार या वेब सिरीज आपल्याला दिसणार आहे. या सोबतच कॉमेडी चे सुपरस्टार समीर चौगुले आणि विशाखा सुभेदार या चित्रपटात प्रदर्शित होणार आहे म्हणजे या वेब सिरीज मध्ये धमालच दिसते.
महेश मांजरेकर ने नवीन वेब सिरीज बद्दल मत मांडले की मला खूप आनंद वाटतोय एक काळी चे मनी या वेब सिरीजची निर्मिती करून. या वेब सिरीज मध्ये पालकांची इच्छा आणि त्यांचे अपेक्षा मुलांकडून दाखवले गेले आहे. प्रत्येक पालकाला वाटते की त्याचे मूल त्याच्या पेक्षा ही मोठे व्हावे, आपले जीवन साकार करावे आणि सदैव खुश रहावे, परंतु खूप वेळेस पिढींचा अंतर हा मधी अडथळा ठरते आणि या पिढीच्या अंतरामुळे विचारांचे मतभेद ही वाढते. आत्ताच्या पिढीचे रहन सहन आणि इच्छा खूप वेगळे आहे. त्यांना जास्त राग पालकांकडून सहन नाही होत, आणि त्यामुळे घरात पालक आणि मुलांमध्ये मतभेद निर्माण होतात. अशाच निर्माण होणाऱ्या विरोधाभास चा उल्लेख या वेब सिरीज मध्ये आपल्याला दिसनार आहे. या वेब सिरीज च्या माध्यमातून आपल्याला पिढींचा अंतर कसे कमी करावे आणि आई बापाचा मुलांबद्दल प्रेम ही दिसणार आहे.
या वेब सिरीज मध्ये आपल्याला नव्या आणि जुन्या विचारांची गंमत जंमत पण दिसणार आहे. महेश मांजरेकर ने या चित्रपटाचे वेब सिरीज चे टीजर प्रदर्शित करून खाली वर्णन लिहिले की “ही कहाणी एक अतरंगी परिवाराची आहे कधी हे तुम्हाला खूप वेडे ही वाटेल परंतु तुम्हाला समजेल की ते अधिक शहाणे आहे”. हे भन्नाट वर्णन ऐकून प्रेक्षक या वेब सिरीज ला पाहण्याकरिता आणखी उत्सुक झाली आहे.
ही वेब सिरीज जिओ स्टुडिओज द्वारा निर्माण केली आहे. या वेब सिरीज मध्ये एक विचित्र परिवाराची अतरंगी कथा दाखवली आहे. आपल्याला या वेब सिरीज मधील सगळे हटके पात्र दिसणार आहे.
मराठी चित्रपट आणि थेटर चे कलाकार प्रशांत दामले आता या चित्रपटा निमित्त पहिल्यांदा वेब सिरीज मध्ये येत आहे. हा जिओ स्टुडिओ चा ही पहिला वेब सिरीज आहे. चित्रपटाचे टीजर बघून वाटते की चित्रपट खूप साधारण घरगुती विषयावर आहे, प्रशांत दामले नि ह्या चित्रपटात श्रीमान काळे यांची भूमिका केली आहे. या वेब सिरीज मध्ये त्यांचे पात्र खूप हसमुख दाखवले आहे. काळेंच्या परिवाराच्या व्यतिरिक्त त्यांच्या शेजारच्यां चीही ओळख या टीजर मध्ये करून दिली आहे. वेब सिरीज चे मुख्य आकर्षक प्रशांत दामले यांनी 1970 मध्ये मराठी थेटर नाटककार म्हणून त्यांची भूमिका सादर केली होती. त्यांचे काही मुख्य नाटक म्हणजे मोरूची मावशी, बहुरूपी आणि तू तिथे मी असे आहे. त्यांचे शेवटचे चित्रपट मुंबई पुणे मुंबई 3 त्यामध्ये त्यांनी स्वप्निल जोशी च्या वडिलांची भूमिका केलती हा प्रसिद्ध चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झालता आणि अत्यंत प्रसिद्ध झालता.
नवीन पिढी ची विचार पद्धती त्यांचे स्वप्न, सुख, आनंद सगळे जुन्या पिढीशी खूप विचित्र आहे. याचे मुख्य दोष आपण तांत्रिक परिवर्तन पद्धतीला देऊ शकतो. आजची पिढी फोन, लॅपटॉप शी जास्त जोडलेली आहे. ही पिढी पुरणपोळी आणि पारंपारिक जेवणाशी नाही तर मॅकडॉनल्ड्स चार बर्गर, पिझ्झा शी आकर्षित होते. आज ची पिढी भरपूर शिकलेली आहे आणि तांत्रिक विज्ञान मध्ये खूप पुढे निघाली आहे, त्यामुळे माता-पितांना त्यांच्या बरोबरीने चालायला खूप अंतर वाटत आहे. या मालिकेत आपल्याला हेच अंतर प्रदर्शित करून दाखवल आहे. हा चित्रपट प्रत्येक घराची सध्याची स्थिती सादर करत आहे त्यामुळे प्रत्येक परिवार या मालिकेशी स्वतःला जोडत आहे. तुम्ही ही वेब सिरीज 28 जून ला घर बसून आपल्या परिवार सह मोबाईल स्क्रीनवर जिओ सिनेमा वर पाहू शकता.
महाराष्ट्र शाहीर आता लवकरच ओटीटीवर पाहायला मिळणार जाणून घ्या | अमेझॉन प्राईम 2023