जाहिराती बंद x
Marathi Movies

Veer Murarbaji Marathi Movie 2023 | Poster Release Date, Streaming Update

×

Veer Murarbaji Marathi Movie 2023 | Poster Release Date, Streaming Update

Share this article
Veer Murarbaji Marathi movie
Veer Murarbaji Marathi movie 2023

वीर मुरारबाजी

नमस्कार मंडळी,आपण या दशकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली स्वराज्यचे भरपूर सारे कथा व चित्रपट पाहिले आहे. या वीर सैन्यां साठी जितके कौतुक करावे तितके कमी‌ पडेल. आता परत एकदा वीर मुरारबाजी या चित्रपटा द्वारे आपल्याला पुरंदर ची लढाई मध्ये झालेले पराक्रम दाखवण्यात येणार आहे. वीर मुरारबाजी या चित्रपटाचे उद्देश्य मुघलांना पळून लावणारे मुरारबाजी देशपांडे यांच्या पराक्रमाची गाथा आजच्या डिजिटल पिढी पर्यंत पोहोचवण्याची आहे. आजची युवा पिढी इंटरनेट आणि त्याच्या सामग्री वर जास्त अवलंबून आहे, त्यामुळे आपल्या इतिहासाचे वीर त्यांच्या समोर चित्रपटाच्या व इंटरनेटच्या माध्यमातून आणणे हे खूप महत्त्वाचे आहे. या चित्रपटाचे निर्माते अजय आरेकर यांच्याद्वारे चित्रपटाचे संपूर्ण उद्देश्य स्पष्ट केले गेले.

Veer Murarbaji Marathi movie
Veer Murarbaji Marathi movie 2023

हा चित्रपट पुढच्या वर्षी 17 फेब्रुवारीला आपल्याला चित्रपटगृहात भेटायला येणार आहे. या चित्रपटात आपल्याला आपले शूर मावळे सोबत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका दिसणार आहे. हे पराक्रमी शूरवीर मावळे स्वराज्यची रक्षा करण्यासाठी स्वतःची जीवाची बाजी लावण्यासाठी सुद्धा तयार आहे. असे सर्व निष्ठावंत मावळ्यांमधील मुख्य नाव रणधुरंधर नरवीर मुरारबाजी देशपांडए यांचे सामोरी येते. या वीर योद्धा च्या पराक्रमा मुळे त्यांना “पुरंदरचे काळभैरव” असेही म्हणून ओळखले जाते. आता मुरारबाजी देशपांडे यांची यशोगाथा आपल्याला मराठी पडद्यावर लवकरच प्रदर्शित होताना दिसणार आहे. या चित्रपटाचे पहिले झलक शिवराज्याभिषेक दिवसाचे विशेष महत्त्व साधून सादर करण्यात आली आहे.

जाहिराती
Ads

 

या चित्रपटाची घोषणा आलमंड्स क्रिएशन्स व ए.ए.फिल्म्स द्वारा करण्यात आली आहे ज्यांच्या द्वारे ‘फत्तेशिकस्त’ आणि ‘पावनखिंड’ सारख्ये उत्तम चित्रपट प्रस्तुत केले गेले आहे. चित्रपटाची निर्मिती अजय आरेकर आणि यांच्या सोबतच अनिरुद्ध आरेकर व  भाऊसाहेब आरेकर यांच्याद्वारे केली गेली आहे. ही कथा 1665 च्या काळातील प्राचीन आहे, या वेळेस मिर्झाराजे जयसिंग आणि त्यांच्या सोबत सरदार दिलेरखान यांनी पुरंदर किल्ल्यावर आक्रमण केले होते, त्या काळात मुरारबाजी देशपांडे चे प्रतिभा बघून छत्रपती शिवाजी महाराजां द्वारा त्यांना पुरंदर किल्ल्याचे किल्लेदार बनवण्यात आले होते. मुरारबाजी देशपांडे द्वारा जवळ जवळ 700 वीर मावळ्यां सोबत दिलेरखान च्या मोठ्या फौजला आश्चर्यकारक पटकले, या लढाईत वीर मावळ्यां द्वारा खूप उत्कृष्ट पराक्रम दाखवल्या गेले.

चित्रपटाचे उद्देश्य सगळ्या युवा पिढी पर्यंत स्वराज्याचा इतिहास पोहोचवण्याचे प्रयत्न आहे, असं केल्याने आपले स्वराज्यचे इतिहास भविष्यकाळातील पिढीत सुरक्षित राहील त्यामुळे या विषयांवर जास्ती ते जास्ती चित्रपट व कथा तयार करणे खूप आवश्यक आहे. प्रेक्षकांना मुरारबाजी देशपांडे हा चित्रपट पावनखिंड सारखाच भव्य दिव्य असेल अशी अपेक्षा आहे.

Baipan Bhari Deva 2023 OTT Release Date | Boxoffice Collection

वीर मुरारबाजी चे कलाकार

प्रेक्षकांना या चित्रपटात मुरारबाजी ची भूमिका कोण साकारणार? इतर कोणते कलाकार प्रदर्शित होणार? या संबंधित जाणून घ्यायला खूप उत्सुकता होते. काही दिवसांपूर्वीच अंकित मोहन यांच्या द्वारे सोशल मीडियाच्या माध्यमातून वीर मुरारबाजी या चित्रपटात मुख्य भूमिका करण्याचे घोषणा केले. चित्रपटाचे ट्रेलर अगदी उत्कृष्ट दिसत आहे, याच्या सोबतच प्रेक्षक अंकित मोहन या अभिनेताला मुरारबाजी देशपांडे च्या भूमिकेत बघून खूप उत्सुक झाले आहे.

अंकित मोहन ने शेअर केले पोस्टर

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankit Mohan (@ankittmohan)

वीर मुरारबाजी या चित्रपटाची घोषणा ऐकूनच देशातले शिवप्रेमी द्वारे या चित्रपटाला भरपूर प्रेम करण्यात आले. सर्व शिवप्रेमी साठी हा चित्रपट एक आनंदाची बातमी आहे. या चित्रपटाचे पोस्टर अवघ्या काही दिवसापूर्वीच प्रक्षेपण करण्यात आले होते. वीर मुरारबाजी ची टीम व या चित्रपटाचे मुख्य अभिनेता अंकित मोहन द्वारा पोस्टर इंस्टाग्राम वर प्रदर्शित करण्यात आले होते.

चित्रपटाचे टीम द्वारा पोस्टरच्या खाली खूप उत्तम पद्धतीने चित्रपटाचे छोटे वर्णन करण्यात आले. त्यांनी या वर्णन मध्ये ऐतिहासिक पावनखिंड रणसंग्राम दिवसाचे उल्लेख केले आणि शूरवीर बाजीप्रभू देशपांडे तसेच बांदल सेनेच्या पराक्रमाला चित्रपटाच्या टीम द्वारा वंदन करण्यात आले. लवकरच या चित्रपटाचे टीजर प्रदर्शित होईल असे चित्रपटाचे टिम द्वारा जाहीर करण्यात आले. वीर मुरारबाजी या चित्रपटात आपल्याला अभिनेता अंकित मोहन सोबतच हरीश दुधाडे, तनिषा मुखर्जी, सौरभराज जैन, संतोष जुवेकर, प्राजक्ता गायकवाड असे उत्कृष्ट कलाकार प्रदर्शित होताना दिसणार आहे.

या चित्रपटात प्रेक्षकांना छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्लेदार वीर मुरारबाजी आणि त्यांचे महापराक्रमी 700 मावळेंचे स्वराज्याचे रक्षेसाठी त्याग व निष्ठा दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटात पुरंदर किल्ल्यासाठी स्वराज्य चा लढा पाहायला भेटणार आहे. हे युद्ध १६६५ मध्ये औरंगजेब द्वारे पाठवलेले दिलेरखान च्या सैन्यासोबत मुरारबाजी देशपांडे आणि त्यांचे सैन्य विरुद्ध झालेले भयंकर युद्ध आहे. या स्वराज्याच्या लढाईत मुरारबाजी देशपांडे यांना वीरमरण पावले, त्याच्यानंतर मिर्झाराजे जयसिंग द्वारा छत्रपती शिवाजी महाराजांसोबत पुरंदरचा तह केला गेला होता.

हे पण वाचा:- Baipan Bhari Deva Collection : रेकॉर्डब्रेक कमाई या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत