जाहिराती बंद x
Marathi Movies

पाहिजे जातीचे मराठी चित्रपट | Pahije Jatiche Marathi Movie

×

पाहिजे जातीचे मराठी चित्रपट | Pahije Jatiche Marathi Movie

Share this article

नमस्कार मंडळी, आपण सर्वच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान विचाराने प्रेरित आहे. असे महान हस्ती ज्यांनी आपले संविधान ची निर्मिती करण्या मध्ये स्वतःचे महत्त्वपूर्ण योगदान दिले, त्यांचे विचार “पाहिजे जातीचे” चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे लेखन विजय तेंडुलकर द्वारे केले गेले आहे.

 आज आम्ही तुमच्यासाठी खास नवीन चित्रपट पाहिजे जातीचे याची माहिती घेऊन उपस्थित आहे,

जाहिराती
Ads

बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिकवणी ला  धार बनवून हा चित्रपट ज्येष्ठ लेखक विजय तेंडुलकर यांच्याद्वारे ‘पाहिजे जातीचे’ हे नाटक लिहिले. या नाटकावर आधारित ‘पाहिजे जातीचे’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शनिवारी (१५ जुलै) या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात येणार आहे. हा चित्रपट प्रसिद्ध कन्नडचे दिग्दर्शक कबड्डी नरेंद्र बाबू आणि मल्लिकार्जुन एन. गजरे द्वारा दिग्दर्शित आहे. “पाहिजे जातीचे” हा चित्रपट आपल्याला सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विचार करण्याची दृष्टी देतो. या चित्रपटाचे ट्रेलर जातीवर होणारे भेद दाखवत आहे, चित्रपटाचे ट्रेलर समाजातील महत्त्वपूर्ण मुद्दे दर्शकां समोर आणत आहे. चित्रपटात आपल्याला विक्रम गजरे हे अभिनेता ज्येष्ठ भूमिकात दिसणार आहे. त्यांच्या सोबतीला चित्रपटात उत्कृष्ट कलाकार सयाजी शिंदे, संजना काळे असे कलाकार पण चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटां मध्ये लहान तरुणाची गोष्ट दाखवली आहे, या तरुणाला समाजा मधील जातीभेद भाव मुळे भरपूर कठोर परिश्रम करावे लागतात. पाहिजे जातीचे या चित्रपटाचे ट्रेलर लॉन्च कार्यक्रमाला विविध कलाकार सयाजी शिंदे, संजना काळे, दिलीप अहिरे, विक्रम गजरे उपस्थित झाले होते, त्यांच्यासोबतच निर्माते डॉ. मल्लिकार्जुन एन. गजरे आणि दिग्दर्शक कबड्डी नरेंद्र बाबू व चित्रपटाचे संवाद लेखिका उमा कुलकर्णी, संगीताचे दिग्दर्शक अन्वेषा द्वारे कार्यक्रमात हजेरी लावली. या चित्रपटाचे झलक अभिनेते साईजी शिंदे द्वारा चित्रपटाचे प्रकाशनाचे कार्यक्रम द्वारा सांगितले गेले.

 

 

चित्रपटाच्या दुनियेमध्ये महान लेखक विजय तेंडुलकर यांनी नेहमीच आपल्या लिखाण आणि नाटकांमधून सामाजिक भाष्य सापडते. या ज्येष्ठ लेखक द्वारा नाटक ‘पाहिजे जातीचे’ च्या आधारावर भारतातील जातिव्यवस्थेवर जबरदस्त भाष्य केलेले दिसत आहे.

पाहिजे जातीचे या नाटकाला प्रेक्षकांद्वारे भरपूर प्रेम दिले गेले होते, आता आपल्याला चित्रपट क्षेत्रात भरपूर यश मिळेल अशी अपेक्षा निर्माते द्वारा व्यक्त केली आहे.

 

१९७२ व १९७५ मध्ये तेंडुलकर द्वारा “पाहिजे जातीचे” हे नाटक भरपूर प्रसिद्ध झालते. आपण नेहमी पाहतो नाटकाचे रूपांतर चित्रपटात प्रदर्शित करून प्रेक्षकांसमोर आणले जाते परंतु जेव्हा चित्रपटाचे लेखन त्याच लेखकांद्वारे केले जाते तेव्हा संदेश अगदी योग्यपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचते. याचे कारण असे विषय लेखका द्वारा तळमळाने मांडले जाते, परंतु नवीन लेखका द्वारा नेहमीच विषय विचलित होते आणि त्याचे नवीन विचार मूळ लेखकाच्या विचारात मिसळते जेणेकरून चित्रपटाचा मुख्य कस राहत नाही.

 

समाजा मधील आपण सतत जातीच्या नावाखाली तरुणांचे जीवना सोबत खेळले गेलेले किस्से ऐकत असतो, कइक युवक जातिवाद समाजा पासून वाचायला स्वतःचे आहुती देत आहेत. आपल्या समाजा मध्ये पूर्वी पासून ब्राह्मण समाजाचे वर्चस्व राहिले आहे, त्याशिवाय शूद्र व खालची जातींना नेहमीच कठीण परिस्थितींचा सामना करावे लागला आहे. काही वर्षांपासून समाजाच्या वर्तना मध्ये फारसा बदल दिसला आहे, आजच्या काळात शहरांमध्ये जातिवाद संपूर्णपणे संपलेला दिसतो परंतु भरपूर सारे देहाती जीवनात आज ही जातिवाद परंपरा लागू आहे. समाजाच्या भीतीने लोकांना रुढी वादी विचारधारा मानल्या शिवाय पर्याय नाही. संविधाना द्वारा जातीच्या विरोधात भरपूर सारे नियम व कानून बनवले गेले आहे. अस्पृश्यता ही भारतातली प्राचीन कुप्रथा मानली जाते, या प्रथां मध्ये खालच्या वर्गीय लोकांना मंदिरात जाणे, विहिरीतून पाणी घेणे, शिक्षण घेणे आणि स्पर्श करण्याची परवानगी नव्हती. या खालच्या वर्गीय समाजाला हरिजन असे म्हणून ओळखले गेले. असे दूर व्यवहार मुळे समाजात अस्थिरता निर्माण झाली होती. गोपाल हरी देशमुख, ईश्वरचंद्र विद्यासागर, जमनालाल बजाज व महात्मा गांधी सारख्या महान क्रांतिकारी द्वारा या रूढीवादी प्रथाची निंदा केली गेली. भरपूर सारे क्रांतिकारी द्वारा हरिजन समाजाला त्यांचे मूळ अधिकार मिळवण्यामध्ये मोठे योगदान दिले. असेच एक महान क्रांतिकारी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. यांच्या मुळेच हरिजन समाजाचे अस्तित्व आणि त्यांचे मूळ अधिकार समाजा समोर उभरले. आपल्याला जाती पातीत न अडकत गुणवत्ता च्या आधारावर माणसाला ओळखता आले पाहिजे, हि शिकवण पाहिजे जातीचे या चित्रपटाच्या द्वारे प्रेक्षकांना दिली जात आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकां द्वारा भरभराट प्रेम देण्यात आले आहे. चित्रपटाचे ट्रेलर 15 जुलैला प्रक्षेपित केले गेले होते.

बघितले गेले तर आपल्या देशाला स्वातंत्र होऊन 75 एकूण वर्ष झाले परंतु आत्ताही समाजातून जातीपातीचे भेद संपूर्ण संपलेले नाही. माणूस सर्व सारखे आहेत फक्त वर्णभेदा मुळे समाजात माणसाची किंमत वेगवेगळी दिली जात आहे. या सर्व जातिवाद गुंतवणूक मध्ये राजकारणी त्यांची पोळी भाजताना आपल्याला समाजात सतत दिसत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत