जाहिराती बंद x
TV - Premiere

दादा कोंडके मूव्ही लिस्ट | झी टॉकीजवर ज्युबिलीस्टार दादा यांचा सिनेमाचा होणार राडा..

×

दादा कोंडके मूव्ही लिस्ट | झी टॉकीजवर ज्युबिलीस्टार दादा यांचा सिनेमाचा होणार राडा..

Share this article

नमस्कार मंडळी आणि मित्रांनो झी टॉकीज ही महाराष्ट्राची प्रमुख चित्रपट वाहिण्यापैकी एक आहे. सध्या TRP मध्ये किंग असलेली वाहिनी आता नंबर 1 वर आली आहे. पण सध्या आता मराठी चित्रपट असलेला एक काळ आणि आताचा खूप फरक आहे. पण काही वादग्रस्त मुळे काही चित्रपट आपल्या पर्यंत पोहचले नाहीत. तेच चित्रपट आपल्याला पाहायला मिळणार ते ही झी टॉकीज या चॅनेलवर. मराठी लोकांच्या मनावर राज करणारे दादा कोंडके यांच्या नावावर खूप रेकॉर्ड आहेत.  तर चला मग कोणते चित्रपट आपल्याला पाहायला मिळणार ते पाहू.

सत्तरच्या दशकात मराठी चित्रपटामध्ये आमूलाग्र क्रांती झाली. तमाशापटांची आणि देवपट या चित्रपटांची जागा आता विनोदीपटांनी घेतली आणि अस्सल गावरान मातीतला द्वी अर्थी विनोद घेऊन दादा कोंडके नावाचे अवलिया मराठी चित्रपटसृष्टीत अवतार घेतला . १९६९ साली ‘तांबडी माती’ हा चित्रपट घेऊन रुपेरी पडद्यावर घेऊ आलो आणि मराठी चित्रपटसृष्टी अजरामर केली. मराठी चित्रपटसृष्टीला अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक दादा कोंडके हे अनमोल रत्न दिले. अश्या या अनमोल रत्नाचे नाव गेली ५० वर्ष मराठी चित्रपटांवर राज्य करत असून आजही हे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. केवळ त्याकाळातली तरुणाई नव्हे, तर वयाची साठी ओलांडलेले प्रेक्षकही दादांच्या चित्रपटांचे वेडे होते. (dada kondke)

जाहिराती
Ads

येत्या ६ ऑगस्टपासून दर रविवारी दादा कोंडके यांच्या हाऊसफुल्ल प्रतिसाद मिळालेल्या सहा सिनेमांतून विनोदाच्या श्रावणसरी बरसणार आहेत. दुपारी १२.०० आणि सायंकाळी ६.०० वाजता दादा कोंडके यांच्या गाजलेल्या सिनेमांतून मनोरंजनाचा पाउस घराघरात कोसळणार आहे.

१९७२ – एकटा जीव सदाशिव, १९७३ – आंधळा मारतो डोळा, १९७५- पांडू हवालदार, १९७६ – तुमचं आमचं जमलं, १९७७ – राम राम गंगाराम, १९७८- बोटं लावीन तेथे गुदगुल्या, १९८०- ह्योच नवरा पाहिजे, १९८७ – आली अंगावर, १९८८- मुका घ्या मुका, १९९०-पळवा पळवी, १९९२- येऊ का घरात व १९९४- सासरचे धोतर हे चित्रपट त्यांच्या कामाक्षी प्रॉडक्शन ने प्रकाशित केले. १९८१ साली ‘गनिमी कावा’ त्यांनी दुसर्‍या बॅनर खाली केला.
मराठी चित्रपटांत इतिहास घडवल्यानंतर दादा हिंदी – गुजराती चित्रपटसृष्टीत गेले. तिथेही त्यांनी जम बसवली. हिंदीतून – तेरे मेरे बीच में (१९८४); अंधेरी रात में दिया तेरे हात में (१९८५), खोल दे मेरी जुबान (१९८६), आगे की सोच (१९८९) हे चित्रपट त्यांनी प्रकाशित केले. १९७७ साली पांडू हवालदार ह्या मराठी चित्रपटाच्या धर्तीवर “चंदू जमादार” हा गुजराती चित्रपट प्रकाशित केला.

येऊ का घरात

येऊ का घरात ?
येऊ का घरात मराठी चित्रपट

येऊ का घरात हा चित्रपट 1992 रोजी प्रदर्शित झाला आहे. येऊ का घरात या चित्रपटाची निर्मिती दादा कोंडके प्रॉडक्शन्स यांनी केली.

कलाकार :दादा कोंडके, उषा नाईक, मधू कांबीकर, राहुल सोलापूरकर, भालचंद्र कुलकर्णी, राघवेंद्र कडकोळ, एन. मनोहर, वसंत शिंदे, दिनानाथ टाकळकर, मुकुंद चितळे, चेतन दळवी, आशा पाटील, अलका इनामदार, माधवी जाधव, विजय चव्हाण, मोहन लोके
पार्श्वगायक :महेंद्र कपूर, उषा मंगेशकर, अनुपमा देशपांडे
गीते :

१) ढोल दणाणा वाजतं, वर आभाळ हालत,

२) चल आंब्याच्या वनात बोलू,

३) लाजू नको, लाजू नको, मागं नको सरूं,

४) आ हो थांबाना…थांबाना पुढे असे जाऊ नका,

५) हळू हळू चालवा गाडी, घाई सदान कदा,

६) लोळू या दोघे दुधात सारखं घोळू या

सासरच धोतर

सासरच धोतर हा चित्रपट 1994 रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते हे दादा कोंडकेच होते.

कलाकार :दादा कोंडके, उषा चव्हाण, सुधीर जोशी, आशा पाटील, शशिकांत शिर्सेकर, भालचंद्र कुलकर्णी, अलका इनामदार, दिनकर झापदार, आशू, चंदू पारखी, शांता तांबे, विजय चव्हाण, निमी कुत्रा
पार्श्वगायक :महेंद्र कपूर, उषा मंगेशकर, अनुपमा देशपांडे
गीते :१) दर्याची दौलत हानली तरीला, सोन्याचा दिस आज उगवला, २) हाय या ना गडे, माझ्याकडे, खाली वर बघा ना मागे पुढे, ३) लाल लाल लाल लाल, तापलाय तवा सांग पोरी चपाती भाजू कवा? ४) मुहूर्ताचा नारळ, झटपट फोडा, जानविर माझ्या आता, ५) पक पक पक पक पकाक, झालो तुझ्यावर फिदा ग पोरी, ६) मी गोमू तू माझा नाखवा, मला मुंबईचा टावूर दाखवा

राम राम गंगाराम

राम राम गंगाराम हा चित्रपट 1977 रोजी प्रदर्शित झाला आहे

कलाकार :दादा कोंडके, उषा चव्हाण, अशोक सराफ, धुमाळ, अंजना, रत्नमाला, मोहन कोठीवान, आशा पाटील, दिनानाथ टाकळकर, मा.भगवान, कुंदनकुमार

पार्श्वगायक :उषा मंगेशकर, महेंद्र कपूर

गीते :१) आला महाराज सोबत बेंडबाजा कुणी म्हणे आला यमराज करु दुनियेवरती राज, २) रुपानं देखणी रंगांन चिकणी कोकीळेचा गळा गं बाई माझ्या बकरीचा समद्यास्त्री लागलाय लळा, ३) मनांत मन तुझ्या गुतलय सांर एकांती चल तुला सांगतेय खरं, ४) गालावरती खळी तुझ्या लावी येडं मला कसं सांगू एक मोका दे, ५) नाकी डोळी छान रं गोरा गोरा पान तत आलं तरुणपणा मिरवायला कुणीतरी न्या हो मला मिरवायला, ६) गंगु तारूण्य तुझ बेफाम जसा इष्काचा अॅीटमबॉम

हयौच नवरा पाहिजे

हयौच नवरा पाहिजे
हयौच नवरा पाहिजे

गावकरी गोपाळ (गोप्या) च्या खोडसाळपणाला कंटाळले आहेत आणि गावातील चर्चच्या पुजारीकडे त्याची तक्रार करतात, जो गोपाला सांगतो की त्याचे सर्व कुकर्म संपवण्यासाठी त्याने लग्न केले पाहिजे. परंतु गोप्या त्याला सांगतो की त्यांच्या भविष्यकत्याने सांगितल्याप्रमाणे हे अशक्य आहे. त्याचे लग्न झाल्यावर त्याचे वडील निघून जातील असे त्याचे कुटुंब.गोप्याला एक सावत्र आई असते जी त्याला आपला मुलगा मानते आणि त्याने लग्न करावे अशी त्याची इच्छा असते.गोप्या गोपीला भेटतो आणि दोघेही एकमेकांकडे आकर्षित होतात पण त्याचे वडील अडथळे आणण्याचा प्रयत्न करतात.

1980 रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन यांचे सर्व काम दादा कोंडके च बघत होते.

कलाकार :दादा कोंडके, जयश्री टी, शरद तळवलकर, रत्नमाला, मोहन कोठीवान, वसंत शिंदे, दिनानाथ टाकळकर, मधु कांबीकर, आशा पाटील, मा. भगवान, प्रमोद नवलकर
पार्श्वगायक :उषा मंगेशकर, महेंद्र कपूर, आशा भोसले
गीते :१) कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या, २) आला थंडीचा महिना झटपट शेकोटी पेटवा, ३) होळीचं सोग घेऊन लावू नको लाडीगोडी, ४) काशी ग काशी तुझी सवय कशी जरा बोल माझे पाशी ग, ५) दूर दूर जावू सुखानं राहू, ६) बंगलोरी नको मंगलोरी मलमल आना की ढाक्याची

बोट लावीन तिथं गुदगुदल्या

बोट लावीन तिथं गुदगुदल्या
बोट लावीन तिथं गुदगुदल्या

छोटूला तमाशा नृत्यांगना मैनाची भुरळ पडते जिथे त्याच्या वडिलांनी एका नर्तिकेच्या मागे त्याचे आयुष्य उद्ध्वस्त केले होते म्हणून त्याने तिच्यापासून दूर राहावे अशी त्याची आई लक्ष्मीबाईची इच्छा आहे. मैनाच्या आईची इच्छा आहे की तिने पुरुषांना प्रलोभन दाखवावे आणि तिच्यावर पैसे टाकावेत ज्याला ती तमाशाची परंपरा मानते. नर्तक पण मैना पूर्णपणे वेगळी आहे आणि ती छोटूवर प्रेम करते म्हणून तसे न करण्याचा निर्णय घेते. शाळकरी मुलांचे अपहरण करून गावात लवकरच दहशत निर्माण होते आणि कठोर स्त्रिया छोटूच्या मदतीने अपहरणकर्त्यांविरुद्ध लढण्याचा निर्णय घेतात ज्यामुळे मैनाला हेवा वाटू लागतो.

कलाकार :दादा कोंडके, उषा चव्हाण, रत्नमाला, वसंत शिंदे, मोहन कोठीवान, पद्मा चव्हाण, पुष्पा भोसले, मुकुंद गोखले, आशा पाटील, गुलाब मोकाशी, विलास रकटे, संपत निकम, हांडे, पाटील, मधुकर नाईक, अशोक कुलकर्ण

पार्श्वगायक :उषा मंगेशकर, महेंद्र कपूर

गीते :१) ओम् नम:शिवाय ओम न:म् शिवाय, २) राया माय तुझी माझ्यावर नित्य राहू दे, ३) आई माझ्या लग्नाची ग का तुलाच पडली घाई, ४) लपवू नका छपवू नका धरलाय हातात काय दावा, ५) गळला मोहर झडली पालवी फळे लागली निळी जांभळी, ६) जसा जीवत जीव घुटमळ तस पिरतीच वाटतय बळ

आली अंगावर

आली अंगावर हा चित्रपट 1982 रोजी प्रदर्शित झाला आहे. याची निर्मिती ही सदिच्छा चित्र आणि दिग्दर्शन हे दादा कोंडके यांनी केले.

कलाकार :दादा कोंडके, उषा चव्हाण, शरद तळवलकर, रत्नमाला, मोहन कोठीवान, वसंत शिंदे, गणपत पाटील, दीनानाथ टाकळकर, हांडे पाटील, संपत निकम, दिनकर इनामदार, बापूसाहेब गावडे, कुंदन, दत्ता, सुलोचनाबाई काळे, भगवान
पार्श्वगायक :महेंद्र कपूर, उषा मंगेशकर
गीते :१) गेली कुठ गांवना बोलल्याबिगर र्‍हावंना, २) वेळ आली बाका तिथं देव करी काय हो, ३) अग राणी भरल्यात दोन्ही माठ गळतय पाणी, ४) जड वाटे भारी मजला मागु कशी, ५) साखर झोपेमधी मी असताना अवचित आला तुम्ही, ६) अग इमला तुझा माझा जोडा भारी जमला

ज्युबिलीस्टार दादा कोंडके यांच्या चित्रपटांचे वेळापत्रक ( झी टॉकीज वर दुपारी १२ आणि सायंकाळी ६ वाजता )

६ ऑगस्ट २०२३ – येऊ का घरात

१३ ऑगस्ट २०२३ – सासरच धोतर

२० ऑगस्ट २०२३ – राम राम गंगाराम

२७ ऑगस्ट २०२३ – ह्योच नवरा पाहिजे

३ सप्टेंबर २०२३ – बोट लावीन तिथं गुदगुदल्या

१० सप्टेंबर २०२३ – आलिया अंगावर

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत