जाहिराती बंद x
देव भक्ती

अण्णाभाऊ साठे जयंती | शुभेच्छा, फोटो, संपूर्ण माहिती

×

अण्णाभाऊ साठे जयंती | शुभेच्छा, फोटो, संपूर्ण माहिती

Share this article
अण्णाभाऊ साठे जयंती
अण्णाभाऊ साठे जयंती

बुद्ध, फुले, शाहू आंबेडकरांचा वारसा सांगणा-या महाराष्ट्राच्या पावन भूमीत सांगली जिल्ह्यातील वाळवे तालुक्यातील वाटेगाव या खेडेगावात भाऊराव साठे व बालुवाई साठे यांच्या पोटी ०१ ऑगस्ट १९२० रोजी क्रांतिकारी विचार घेऊन एक महान रत्न जन्मास आले ते व्यक्तिमत्व म्हणजे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे होय. सामाजिक विषमतेचे घोट लहानपणापासूनच अण्णाभाऊंना गटागटा प्यावे लागले. अण्णाभाऊ चा जन्म मागजातीत झाला त्याकाळी माग म्हणजे एक गुन्हेगार जात समजली जायची समाजाला आणि शासकांना ही वाटायचे म्हणून समाज आणि शासन यांची नेहमीच या समाजावर वक्रदृष्टी राहिली. या समाजाची नेहमीच उपेक्षा आणि निंदा अनालसची व्हायची या सगळ्या बाबींचा अण्णाभाऊ ने स्वतः हा अनुभव घेतला व उघड्या डोळ्यांनी पाहिलं आणि जे भोगलं देखील होत. अण्णाभाऊंना शाळेत दाखल केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शाळेतील मास्तरांना कसल्याही प्रकारची चूक नसतानाही जातीचा द्वेष व तिरस्कार करत अण्णाभाऊंना शिक्षा केली त्याच गोष्टीचा मनात राग धरून अण्णाभाऊने मनाशी एक खून गाठ बांधली व कायमची शाळा सोडली, अण्णाभाऊंची शाळा दीड दिवसातच सुटली म्हणूनच आण्णाभाऊ साठे हे फक्त दीड दिवस शाळा शिकले असं म्हणतात. मात्र उच्च वर्णी यांची मिरासदारी असलेले शिक्षण अण्णाभाऊंच्या मनाला भावले नाही केवळ दीड दिवस शाळेत जाऊन भेदभावांच्या शिक्षणाला त्यांनी नाकारले. अण्णाभाऊ चे वडील (भाऊराव साठे ) हे मुंबईला मजूर म्हणून काम करत होते अधून मधून जमा झालेली तुटपुंजी घरी आणत व त्यातच संसाराचा गाडा कसाबसा चालवीत असत मुंबईतील लोकांचे आरामदायी जीवन पाहून आपल्याही मुलांनी शिकावे सुशिक्षित व्हावे असे त्यांना मनोमनी वाटायचे. काही दिवसांनी त्यांनी स्वतः सोबत अण्णाभाऊंना मुंबईला घेऊन आले मुंबईतील सुशिक्षित व उचभ्रू समाजातील लोकांचे जीवन पाहून अण्णाभाऊंना शिक्षणाची प्रेरणा मिळाली. कामावर जाताना येताना गाड्यांच्या पाट्या दुकानाच्या पाट्या हळूहळू वाचायला लागले. तेथील लोकांनी दिलेल्या पुस्तकांचा वापर करून अण्णाभाऊंना वाचन लेखन करता येऊ लागले त्यांना वाचनाचा छंद लागला याच दरम्यान अनेक ठिकाणचे भाषणे सभा ऐकून ते प्रभावित झाले सतत ते लिखाण करायचे व त्यांनी देखील भोगलेले सोसलेले व अनुभवलेले दुःख अवतीभवती पाहिलेले दलितांचे उपेक्षतांचे शोषितांचे कामगारांचे दारिद्र्य जीवन व त्यांची दयनीय अवस्था होत असलेल्या हालापेष्ठा अण्णाभाऊंनी वास्तव लेखन करून अख्या विश्वाला स्वतःच्या साहित्यातून वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये जगासमोर वास्तववादी जीवनाचे सत्य तेवढ्याच ताकतीने व तळमळीने मांडले. अण्णाभाऊंनी वाटेगाव चे नाव सार्थक ठरवत कुवतिप्रमाने प्रस्थापित समाज व्यवस्थेतील दलित, उपेक्षित कष्टकरी जीवन जगण्यासाठी धडपड करणान्या सामान्यातल्या अतिसामान्य माणसाच्या दुःखाची कैफियत जगाला आपल्या अर्थपूर्ण साहित्यातून मांडले व वाटेगाव चे नाव जगाच्या पाठीवर आज अजरामर केले. अण्णाभाऊंच्या लेखणीला वास्तवाची धार होती, सत्याची किनार होती आणि माणुसकीची झालर होती, लेखणीतून अण्णा भाऊंनी स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता या मानवी मूल्यांचा विचार मांडला. अण्णाभाऊ साठे हे पहिले दलित साहित्यिक आहेत. आर्थिक गुलामगिरी पेक्षा मानसिक गुलामगिरी भयानक असून हे गुलामगिरी येथील समाज व्यवस्थेने निर्माण केली आहे. अशा जातीपातीच्या व्यवस्थेला गुलामगिरीतून सुटण्यासाठी उठाव सुरू केला, त्यांनी समतेवर आधारलेले माणुसकीचे घालणाऱ्या, फुले, आंबेडकरांचा संदेश अण्णांनी शब्दबद्ध केला. जग बदल घालूनी घाव मज सांगून गेले फोडली.. डरकाळी फोडणाऱ्या या वाटेगावच्या वाघाला १०३ भीमराव, गुलामगिरीच्या या चिखलात रुतून बसला का व्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम व विनम्र अभिवादन..!

जाहिराती
Ads

घातले, आग, अहंकार, वैर ला रूपांकार दिला. जग निर्माण करण्यासाठी चातुवर्ण्यावर घाव अण्णाभाऊ एक वेगळाच ठसा घेऊन जन्मास आले.

ऐरावत अण्णाभाऊ साठे ज्या समाजात जन्मले त्या समाजाला परिपूर्ण पणे उभे करण्याचे काम त्यांनी केले. वास्तव हा अण्णाभाऊंच्या लेखनाचा पैलू होता. दिन, दुबळा, गोर- गरीब शोषित, कामगार यांच्या व्यथा जाणून लेखन करून जगासमोर ठेवण्याचा त्यांनी अथक प्रयत्न केला. अण्णाभाऊंचे लेखन वाचकांच्या थेट हृदयाला घाव घालणारे विषमतावादी समाजव्यवस्थेतील अन्याय, अत्याचार व शोषणाच्या विरोधात बंड करून उठण्यास चालना देणारे आहे. म्हणूनच अण्णाभाऊंचे साहित्य येथील समाज व्यवस्थेला आत्मचिंतन करण्यास लावणारे आहे, ते परिवर्तनवादी असून प्रेरणादायी आहे यात शंकाच नाही. अण्णाभाऊंच्या साहित्याची दखल घेत रशियातील कम्युनिस्ट सरकारने अण्णाभाऊंना रशिया भेटीचे निमंत्रण दिले. अण्णाभाऊ चितोड़ की राणी या विमानातून रशियाच्या प्रवासाला गेले त्या ठिकाणी भाषणे केली, भाषणामध्ये त्यांनी आवर्जून छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमानाने उल्लेख करत त्यांचे पोवाडे गायले, शिवरायांची कर्तबगारी अण्णाभाऊंनी शाहिरीच्या माध्यमातून रशियामध्ये पोहोचवली. शोषित समाजाला शोषणमुक्त करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर कथा, कादंबऱ्या, पोवाडे, लोकनाट्य, नाटके लिहिली अण्णांचे सहकारी अमर शेख व गव्हाणकर यांच्या मदतीने लाल बावटा या कलापथकाची स्थापना केली. हाती खंजेरी व डफली घेऊन आपल्या उत्कृष्ट अभिनयाद्वारे रंगमंचावर उभा राहून कामगारांच्या शोषित व पीडित उपेक्षित वर्गाची संघर्षाची जीवनगाथा श्रोत्यांसमोर सादर केली. याच दरम्यान संयुक्त महाराष्ट्राच्या लढा सुरू झाला, या लढा दरम्यान अण्णाभाऊंनी महाराष्ट्राच्या फाळणीवर द्विअर्थी कवन गायले माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होतीया कायली या द्विअर्थी लावणीने संयुक्त महाराष्ट्राचा लढा अधिक गतिमान केला व मुंबई ही महाराष्ट्राचीच आहे याचा पाठपुरावा केला. अण्णाभाऊ साठे म्हणजे साहित्यातील रत्न, साहित्य विधातील चमत्कार, कारण कसल्याही प्रकारचा शैक्षणिक वारसा व वातावरण नसताना अठराविश्व दारिद्र्य लाभलेल्या व फक्त नावाला शाळेत गेलेल्या अण्णाभाऊंनी १४ कथासंग्रह, ३५ कादंबऱ्या, १० पोवाडे, १४ लोकनाट्य, नाटके व कविता प्रवास वर्णन ऐवढे विपुल हृदयस्पर्शी साहित्य लिखाण केले. त्यांच्या साहित्याचे वाचन करताना एक गोष्ट नक्कीच जाणवल्याशिवाय राहत नाही, ती म्हणजे एखाद्या सुसंस्कृत व उच्च विद्याविभूषित साहित्यकाला ही लाजवील एवढी उच्च दर्जाची अण्णाभाऊंची साहित्यरचना आहे. अण्णाभाऊंची फकीरा ही कादंबरी स्फोटक कलाकृती आहे, क्रांतीची बिनी मारायची असेल तर, जग बदलण्यासाठी विषमतावादी समाज रचनेवर विचारांचा घाव घातलाच पाहिजे, म्हणून अण्णाभाऊ सांगतात ‘तू गुलाम नाहीस तू या जगाचा मालक निर्माता आहेस’ ही पृथ्वी शेषाच्या मरताकावर तरलेली नसून ती श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे हा साक्षात्कार करून देणारा विचार मानवी समाजाच्या समतेच्या लढ्याला प्रेरणादायी आहे. त्यांच्या कादंबऱ्यावर चित्रपट निर्मिती करण्यात आलेली आहे आवडी या कादंबरीवर- टिळा लावते रक्ताचा, अलगुज वर अशी ही साताऱ्याची तहा, फकीरा वर फकीरा, माकडीचा माळ वर डोंगराची मैना, वैजयंता बारागावचे पाणी, वारणेचा वाघ वर वारणेचा वाघ अशी दर्जेदार चित्रपटांची निर्मिती देखील झालेली आहे. अण्णाभाऊंच्या साहित्याचे महत्त्व परदेशात गाजले आहे. परंतु अण्णाभाऊ सारख्या प्रतिभावंत साहित्यकला भारत सरकारने, समीक्षकांनी विचारवंतांनी मात्र दुर्लक्षित ठेवले. अण्णाभाऊंच्या चिखलातील कमळाने अग्नीदिव्य उभे केले, वारणेच्या खोऱ्यात अलगुजचे सूर्य घुमविले, माकडीच्या माळावर केवड्याचे कणीस रुजू अण्णाभाऊंच्या लेखणीला तलवारीची धार होती आले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत