जाहिराती बंद x
देव भक्ती

आषाढी एकादशी 2023 : विठूराया माहिती, शुभेच्छा,स्टेटस सर्व काही…

×

आषाढी एकादशी 2023 : विठूराया माहिती, शुभेच्छा,स्टेटस सर्व काही…

Share this article
आषाढी एकादशी माहिती
आषाढी एकादशी

आषाढी एकादशी 2023 : विठूराया माहिती, शुभेच्छा,स्टेटस सर्व काही…

आषाढी एकादशी लवकरच येत आहे. आपण मराठी नेहमी या एकादशीचा उत्सुकताने वाट पाहत असतो. या आषाढी एकादशी मध्ये वारकरी समाज पाई दिंडी मध्ये सहभागी होतो आणि विठ्ठलाचा हरी जप करत पंढरपूर ला पोहोचतो, याला आपण आषाढी वारी असं म्हणतो. पंढरपुरमध्ये पोहोचल्यानंतर चंद्रभागे नदी मध्ये स्नान केले जाते आणि विठ्ठलाचं मनोभावे दर्शन घेतले जाते. या आषाढी निमित्त महाराष्ट्र मध्ये विभिन्न स्थानावरून पालख्या पंढरपूरला पोहचतात. जसं की पैठण वरून एक नाथाची पालखी, त्रिंबकेश्वर वरून निवृत्ती नाथाची पालखी, देहू वरून तुकारामाची पालखी, उत्तर भारता मधून कबीराची पालखी आणि आळंदीवरून संत ज्ञानेश्वर ची पालखी ही पंढरपुरास येते.

जाहिराती
Ads
आषाढी एकादशी माहिती
आषाढी एकादशी

या आषाढी एकादशी निमित्त विशेष करून वारकरी समाजाला उपवास करायचे विशेष महत्त्व आहे. घरा घरातून लहान ते मोठे सर्व जण हा एकादशीचा उपवास पकडतात. आज कालच्या या आधुनिक युगामध्ये सर्वजण एकमेकांना आषाढी एकादशी निमित्त शुभ भावना आणि शुभ संदेश पाठवतात. व्हाट्सअप वर पंढरीचा स्टेटस ठेवून आपली संस्कृती आणि भाव व्यक्त करतात. विभिन्न शाळा आणि कॉलेजमध्ये या आषाढी निमित्त कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन केले जाते. ही आषाढी एकादशी इंग्रजीच्या जून कीवा जुलै महिन्यात येते. या आषाढी एकादशी पासून चतुर मासाचा काळ सुरू होतं आणि कार्तिकी एकादशीला संपतो.  अशी मान्यता आहे की या चार महिन्याच्या काळात भगवान श्रीहरी विष्णू क्षीरसागरात शेषनागा वर योग करतात आणि कार्तिकी एकादशीला भगवान श्रीहरी विष्णू या योग निद्रा मधून बाहेर येतात. कार्तिकी एकादशीला प्रबोधिनी एकादशी असे ही म्हटले जाते. या चतुर महिन्याच्या काळात काही लोक मांसाहारी हे भोजन करतात. पंढरपूरची मंदिर खूप पुरातन आहे आणि या मंदिराची भरपूर वेळा पुनर्बांधणी पण झाली आहे. त्यामध्ये विठ्ठलाची मूर्ती अतिशय सुंदर आहे. प्रतिष्ठान आणि राष्ट्रकुटा द्वारा इतिहासा मध्ये या मंदिराला खूप महत्त्व दिले होते.

 

या आषाढी एकादशी च्या निमित्त खूप सारे देवांची कथा सांगितली जाते. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि असे भरपूर वारकरी समाजाच्या लोकांनी विठ्ठलाची अनेक वर्ष मनोभावी भक्ती केली. वारकरी समाजाने विठ्ठलाच्या भक्तीमध्ये अनेक अभंग आणि गाणे रचले. याच्या मधून सर्वात प्रसिद्ध अभंग म्हणजे अमृताहुनी गोड, हे अभंग लहान पासून ते मोठ्या पर्यंत सर्वांना आवडते. पांडुरंगष्टकम स्तोत्र श्री आदि शंकराचार्य द्वारा रचले गेले.

 

जर आपण मराठी महिन्याच्या हिशोबाने बघितलं तर प्रत्येक मराठी महिन्यात दोन एकादशी येतात, ज्या वर्षात जास्त मास असेल त्यावर्षी आपल्याला दोन एकादशी अधिक साजरी करायला भेटतात. याचे अर्थात सामान्य वर्षांमध्ये 24 एकादशी साजरी केली जाते परंतु अधिक मासाच्या वेळेस 26 एकादशी साजरी करतात. या आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशीला देवशयनी असे नाव दिले आहे. मराठी लोकांसाठी आषाढी एकादशीचे महत्त्व खूप उच्च आणि वेगळे आहे. महाराष्ट्र मधून वेगवेगळ्या भागातून लाखो लोक पायी दिंडी चालून पंढरपूरला हजेरी लावतात. या दिंडीमध्ये विठ्ठलाचे नाव घेऊन भूक तहान वारकरी समाज सगळे विसरून जाते.

 

विठ्ठल हे विष्णूचे अवतार समजले जाते, म्हणून एकादशीला पंढरपुर विठ्ठलाचे दर्शन घेतले जाते. एकादशी च्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून तुळस वाहून विष्णू पूजा केली पाहिजे. या दिवशी संपूर्ण दिवस उपवास केले जाते. रात्री सर्व लोक मिळून हरीचे भजन गातात आणि जागरण करतात. विठ्ठल या देवाचा नावाचा जयघोष केला जातो, पंढरपूरला सर्व वारकरी समाज विठ्ठलाची मनापासून आरती आणि सेवा करतात. याच्यानंतर वामनाची पूजा करून पारं सोडले जाते. या दिवशी विष्णूची पूजा करून रात्री तुपाचा दिवा लावण्याची प्रथा आहे.

 

एकादशीला असंख्य लोक उपवास करतात फक्त मराठीच नाही तर इतर भागांचे लोकही ह्या एकादशीत सहभागी होतात. उपवास करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे, या दिवशी चे व्रत खूप भक्ती भावाने करावे.

पुराणांमध्ये आषाढी एकादशीचे खूप मोठे महत्त्व मानले जात आहे, परंतु आत्ताच्या युगात हिंदू धर्मात एकादशीला साधारण महत्व दिले आहे.

 

अशी मान्यता आहे की या दिवशी विष्णू पूजा केलेली आणि उपवास केल्यावर भावकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि देव त्यांच्यावर प्रसन्न होतात.

एकादशीच्या दिवशी विष्णूचे शयन सुरू झाल्यानंतर विधी विधान पूजा कशी करावी याकरिता काही महत्त्वाची टिप्स.

 

  • एकादशी च्या दिवशी सकाळी प्रातःकाल मध्ये उठून स्नान करावे.

 

  • पूजा चे मंदिर अतिशय साफ आणि स्वच्छ करून विष्णू देव ची मूर्ती ला आसन ग्रहण करावे आणि देवाची मनापासून पूजा करावी.

 

  • विष्णू देवला पिवळे, वस्त्र, पिवळे फुल, पिवळ्या चंदन लावावे त्यांच्या हातामध्ये शंख, चक्र, गदा आणि पद्मा सुभोषित करावे.

 

  • विष्णू देवला पान आणि सुपारी अर्पण करावे आणि धूप दिवा पुष्प चढावे. विष्णू देवाची आरती करावे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत