जाहिराती बंद x
Marathi MoviesOTT News

गुलाम बेगम बादशाह”सोबत नशीब आजमावण्यासाठी भरत जाधव, नेहा पेंडसे, संजय नार्वेकरचा ‘अल्ट्रा झक्कास’वर उत्कंठावर्धक खेळ!

×

गुलाम बेगम बादशाह”सोबत नशीब आजमावण्यासाठी भरत जाधव, नेहा पेंडसे, संजय नार्वेकरचा ‘अल्ट्रा झक्कास’वर उत्कंठावर्धक खेळ!

Share this article

Bharat Jadhav, Neha Pendse, Sanjay Narvekar to try their luck with “Ghulam Begum Badshah” in an exciting game on ‘Ultra Zakkas’!

अल्ट्रा झकास प्रस्तुत मैत्रीरहस्य आणि अनपेक्षित ट्विस्टची मनमोहक कथा  : “गुलाम बेगम बादशाह” १२ जूनला वर्ल्ड डिजिटल प्रीमिअर!

जाहिराती
Ads

अल्ट्रा झकास(Ultra Jhakaas) ओटीटी मराठी प्लॅटफॉर्मवर सातत्याने वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट, नाटक, बायोग्राफी प्रदर्शित होत असतात. कुलस्वामिनी, बोल हरी बोल, अदृश्य, अथिरन यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटानंतर अल्ट्रा झकास ओटीटी मराठी आता प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे एक नवा सस्पेन्स थ्रीलर चित्रपट गुलाम बेगम बादशाह. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्लॅटफॉर्मवर लॉन्च झाला आहे.

Gulam begam Badshah Ultra Jhakaas
गुलाब बेगम बादशाह मराठी चित्रपट

गुलाम बेगम बादशाह चित्रपटाची कथा 3 मित्रांच्या विक्रम (भरत जाधव), समीर (संजय नार्वेकर) आणि लोरा (नेहा पेंडसे) यांच्याभोवती फिरते. लोरा स्ट्रगलिंग आणि नवीन अभिनेत्री  असते तर विक्रम पॅथॉलॉजी लॅबमध्ये काम करतो आणि समीर हा नामांकित वृत्तपत्राचा पत्रकार असतो.  परिस्थिती बिकट असल्यामुळे या तिघांनाही चांगले पैसे कमवायचे असतात. आर्थिक भार कमी करण्यासाठी तिघेही विविध मार्ग शोधणं सुरू करतात. तथापि, कथेत पुजारीच्या येण्याने अनपेक्षित ट्विस्ट येतो. तो खरोखर पुजारी आहे की एक रहस्यमय अनोळखी व्यक्ती? विक्रम, समीर, लोराच्या आयुष्यात नक्की काय उलथापालथ होते? तिघांना पैसे कमवण्यासाठी मार्ग मिळतो की नाही? मार्ग शोधता शोधता त्या तिघांमधील मैत्रीवर त्याचा काय परिणाम होतो का? यासाठी मात्र तुम्हाला चित्रपट पाहायला लागेल.

गुलाम बेगम बादशाह OTT Update

चित्रपटाचे नाव  गुलाम बेगम बादशाह
OTT प्लॅटफॉर्म  अल्ट्रा झकास ॲप
OTT प्रकाशन तारीख 12 जून 2023
नाटकीय प्रकाशन तारीख  – 2013
दिग्दर्शक  राज फिरके
इंग्रजी होय
तारांकित जगदिश शेलार, तेजा देवकर, दिलिप गोसावी, नवनाथ पारखे, नाना बच्चाव, नेहा पेंडसे, पथिक भंडारी, प्रशांत देशपांडे, प्रशांत पिंगळे, भरत जाधव, रफिक सैयद, विघ्नेश जोशी, शरद पोंक्षे, संजय नार्वेकर
सिनेमॅटोग्राफी प्रताप नायर
संगीत दिग्दर्शक शशांक पोवार
संपादक नवीन नूली
चित्रपट उद्योग  मराठी
CBFC U\A
शैली  कॉमेडी
बजेट टीबीए

“गुलाम बेगम बादशाह” हा मैत्री, रहस्य आणि नशिबाचा पाठलाग करत चित्रपटातील गूढ कथा कशी उलगडून दाखवते यासाठी येत्या १२ जून २०२३ ला अल्ट्रा झकासवर ओटीटीवर चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर नक्की पाहा.

गुलाम बेगम बादशाह या चित्रपटाचे कलाकार व टीम

निर्माता :किरण वाघ
दिग्दर्शक :राज फिरके
कथा :राज फिरके
पटकथा :राज फिरके
संवाद :राज फिरके
संगीत :अशोक पत्की
पार्श्वसंगीत :शशांक पोवार
छायालेखन :प्रताप नायर
संकलक :अशोक रूमडे
गीतलेखन :अश्विनी शेंडे, गुरू ठाकूर
कला :अरूण रहाणे, प्रसाद रहाणे
वेषभूषा :पूर्णिमा ओक
नृत्य दिगदर्शक :राजेश बिडवे, कूनिका, कार्तिक पॉल
पब्लिसिटी डिझाईन :मिलिंद मटकर
ध्वनिमुद्रक :संदिप राऊळ
कलाकार :जगदिश शेलार, तेजा देवकर, दिलिप गोसावी, नवनाथ पारखे, नाना बच्चाव, नेहा पेंडसे, पथिक भंडारी, प्रशांत देशपांडे, प्रशांत पिंगळे, भरत जाधव, रफिक सैयद, विघ्नेश जोशी, शरद पोंक्षे, संजय नार्वेकर

रसिकांच्या आवडीनुसार हजारो तासांच्या अफलातून मनोरंजनाची पर्वणी बहाल करणाऱ्या ‘अल्ट्रा झकास’वर मराठी भाषेत डब केलेले दाक्षिणात्य आणि हॉलीवूडच्या चित्रपटांसोबतच जुने आयकॉनीक मराठी चित्रपट आणि विविध विषयांवरील वेब सीरिज, किड्स अॅनिमेश, वेब-शो असा मनोरंजनाचा भरगच्चं खजिना उपलब्ध आहे. या कार्यक्रमांची मेजवानी अनुभवण्यासाठी ‘अल्ट्रा झकास’ नक्की डाऊन लोड करा. अधिक माहितीसाठी www.ultrajhakaas.com,

App link: https://ultrajhakaas.app.link

‘गुलाम बेगम बादशाह’ या चित्रपटाची प्रोमो लिंक

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत