जाहिराती बंद x
Netflixओटीटी प्लॅटफॉर्म

Heart Of Stone 2023 Streaming : रिलिज डेट | कास्ट | ओटीटी | आलियाचा पहिला हॉलिवूड मूवी

×

Heart Of Stone 2023 Streaming : रिलिज डेट | कास्ट | ओटीटी | आलियाचा पहिला हॉलिवूड मूवी

Share this article
Heart Of Stone Aliya Bhatt
Heart Of stone movie release date

नमस्कार मित्रांनो, हार्ट ऑफ स्टोन [ Heart Of Stone] हे नाव आता फक्त हॉलीवुड मध्ये नाही तर बॉलीवूड मध्ये ही भरपूर गाजलं आहे आणि याचं कारण म्हणजे बॉलिवूडची सर्वात लाड़की अभिनेत्री आलिया भट आहे. आलिया भट लवकरच हार्ट ऑफ स्टोन द्वारा हॉलीवुड मध्ये डेब्यू करताना दिसत आहे. चित्रपटाचा पहिला लूक समोर आला आहे. आलिया भट ने स्वतः तिच्या इंस्टाग्राम द्वारा चित्रपटाचे पहिले चित्र प्रदर्शित केले आणि चित्रपटाची ओळख करून दिली आणि काहीच वेळात चित्रपटाचे पोस्टर भरपूर लोकांपर्यंत पोहोचले, तिच्या या सोशल मीडियाच्या पोस्टरला लाखोंनी लाईक आणि कमेंट्स भेटत आहे.

आलिया भट ला बॉलीवूडची सर्वात मोठी अभिनेत्री मानली जाते. हार्ट ऑफ स्टोन च्या पहिले आलिया भट  राझी, आरआर, ब्रह्मास्त्र आणि हायवे असे सुपरहिट चित्रपटांसाठी आलिया भट ची ओळख होत होती. याचा अंदाज आपण कोरोना काळात जेव्हा सगळे अभिनेत्रे हिट चित्रपट द्यायचे स्वप्न बघत होते त्यावेळेस या अभिनेत्रीने सतत चार हिट चित्रपट दिले आणि 2022 ची बॉलीवूडची क्वीन झाली. बॉलीवूड मध्ये राज केल्यानंतर आता ही अभिनेत्री हॉलीवुड मध्ये धमाल करत आहे.

जाहिराती
Ads

आलिया भट च्या चित्रपटाचा पहिला लूक पाहून प्रेक्षक खूप उत्सुक झाली आहे. सगळ्यात जास्त उत्सुकता प्रेक्षकांना आलिया भटला खलनायक रूप मध्ये बघून होत आहे. काही प्रेक्षकांचे म्हणणं आहे आलिया भट खलनायक रूप मध्ये खूप उत्कृष्ट दिसत आहे तिला असे धमाल पात्रांमध्ये बघायला खूप मज्जा येत आहे, दुसरीकडे काही प्रेक्षकांचे म्हणणं आहे की हॉलीवुड मध्ये एशियन लोकांना प्रमुख पात्र द्यायचा रिवाज नाही, त्यांना सतत छोटे पात्र किवा खलनायक दाखवले जाते.

हार्ट ऑफ स्टोन या चित्रपटात आलिया भट चे नाटक आणि चित्राची फैंस खूप तारीफ करत आहे. काही फॅन्स तर चित्रपटाला सुपरहिट सांगितले आहे.

या थ्रिलर चित्रपटात आलिया भट एक विपक्षी पात्र करत आहे, चित्रपटात ती आपल्या सह कलाकार गैल गैडोट आणि जेमी डॉरनन ला खूप चांगली टक्कर देती आहे. चित्रपटाचा ट्रेलर बघून वाटते की आलिया भट सर्व हॉलीवुड च्या अभिनेत्रांना भारी पडली आहे. चित्रपटाचा ट्रेलर ब्राझील मध्ये झालेला वर्ल्ड लाइफ इव्हेंट मध्ये दाखवला आहे.

  • हार्ट ऑफ स्टोन हा चित्रपट ११ ऑगस्ट ला नेटफ्लिक्स वर प्रदर्शित होणार आहे,
Heart Of Stone Aliya Bhatt
Heart Of stone movie release date

 

चित्रपटाचे नाव  Heart Of Stone 
OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स
OTT प्रदर्शित तारीख 11 ऑगस्ट 2023
कॅटेगरी  ऍक्शन, थ्रिलर
दिग्दर्शक टॉम हार्पर
तारांकित जेमी डोर्नन, गॅल गॅडोट, आलिया भट्ट
इंग्रजी इंग्रजी, तेलगू, हिंदी, तमिळ
चित्रपट उद्योग हॉलीवूड, पॅन इंडिया

हा चित्रपट टॉम हारपर द्वारा दिग्दर्शित केला आहे. हा शानदार चित्रपट ग्रेग रूका आणि एलिसं श्रोडर द्वारा लिहिला गेला आहे. आलिया भट द्वारा या चित्रपटाचे ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित केले आहे आणि त्यासोबतच अभिनेत्रीने लिहिले आहे ‘हार्ट ऑफ स्टोन ११ ऑगस्ट’ प्रदर्शीत होत आहे.हा चित्रपट जेवढा धमाल दिसतोय त्याच्यापेक्षा जास्त याचे कलाकार धमाल आहे. या चित्रपटात सर्व कलाकारांनी वेगवेगळी भूमिका केली आहे. गैल गैडोट  द्वारा रेचल स्टोन चा किरदार केला आहे, जी खूप मोठ्या पदावर काम करत अस्ते. तिचे प्रमुख एजंट पारकर आहे. पारकर हा किरदार डॉरनन द्वारा चित्रपटात प्रदर्शित केला आहे.

नेटफ्लिक्स द्वारा एक प्रेस मुलाखत मध्ये म्हणल्या गेलं रेचल ची (MI-6) ला नाही माहिती की स्टोन खऱ्या अर्थाने चार्टर साठी काम करते, एक गुप्त संघटन जे दुसऱ्या जासूसान शी लपलेला आहे आणि जो त्यांच्या प्रतिद्वंदीला समाप्त करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानचा उपयोग करत आहेत.

या अदोगर या काही दशकात आपण एक गोष्ट हॉलिवूड बद्दल लक्षात घेतली आहे, भारतीय सिनेमा अभिनेते हॉलीवुड दिग्दर्शकांसाठी आता मुख्य आकर्षना चे कारण झाले आहे. याच्या पहिले आपण इरफान खान, प्रियंका चोपडा, रणदीप हुड्डा, डिंपल कपाडिया, ओम पुरी, अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय सारखे उत्कृष्ट कलाकार हॉलीवुड मध्ये जाऊन आपला रंग जमवताना पाहिले आहे. आलिया भट ची हार्ट ऑफ स्टोन हा चित्रपट खूप दिवसापासून चर्चेमध्ये आहे या चित्रपटासाठी आलिया भट हॉलीवुड मध्ये तिच्या कलेचं उत्कृष्ट प्रदर्शन करत आहे. या चित्रपटांमध्ये आलिया भट सोबत गैल गैडोट प्रमुख भूमिकेमध्ये आहे. या दोघांच्या चित्रपटा मध्ये टशन बघायला खूप उत्सुक आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला भारतामध्ये प्रेक्षकांकडून खूप सकारात्मक भाव भेटत आहे.

चित्रपटाच्या या ट्रेलर मध्ये आपल्याला आलिया भट एक ॲक्शन अवतार मध्ये दिसत आहे ती या चित्रपटात खलनायक च्या रूप मध्ये खूप आकर्षित दिसत आहे. या चित्रपटात आलिया भट चे पात्र चे नाव केया धवन असं सांगितलं जात आहे. ही खलनायक चित्रपटामध्ये  सगळं उध्वस्त करत असते. फॅन्स चित्रपटा द्वारा आलिया भटला दिलेला नवीन अवतार बघून खूप खुश आहे. या चित्रपटाचे ट्रेलर पाहून प्रेक्षक ट्विटरवर त्यांची प्रतिक्रिया ही मांडत आहे. हार्ट ऑफ स्टोन ११ ऑगस्टला ओटीटी प्लॅटफॉर्म वर प्रदर्शित होत आहे.

किया धवन हे पात्र या चित्रपटात अतिशय जबरदस्त वाटत आहे. चित्रपटात आलिया सोबत आणि  जेमी डॉरनन पण दिसत आहे, असं बोलले जाते की आलिया भट ने गर्भवती असताना या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू केले होते आणि चित्रपटाच्या सेट वर हार्ट ऑफ स्टोन ची सर्व टीम आलिया भट ची खूप काळजी घ्यायचे. आलिया सांगते की तिला एकदम फुलासारखं जपले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत