जाहिराती बंद x
अमेझॉन प्राईम व्हिडिओबॉलिवुड चक्कर

रणवीर सिंग आणि आलिया भटचा नविन सिनेमा ” रॉकी और रानी की प्रेम कहाणी ” येणार जुलै महिन्यात

×

रणवीर सिंग आणि आलिया भटचा नविन सिनेमा ” रॉकी और रानी की प्रेम कहाणी ” येणार जुलै महिन्यात

Share this article

नमस्कार मित्रांनो करन जोहरची आगामी फिल्म ‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी‘ याची चर्चा तर तुम्ही ऐकलीच असेल. लवकरच हा धमाल चित्रपट चित्रपटगृहात तुमच्या भेटीला येणार आहे, याचे धमाल टीजर तर पाहिलेच असेल. या आर्टिकल च्या माध्यमातून आम्ही तुम्हाला चित्रपटाची संपूर्ण माहिती देणार आहे. या चित्रपटात आपल्याला आलिया भट आणि रणवीर सिंग ची गोड़ जोडी परत एकदा दिसणार आहे. या जोडीने गली बॉय या चित्रपटात खूप धमाल केली होती आणि प्रेक्षकांनी या जोडीला मनापासून प्रेम दिले होते, ही जोडी रॉकी और राणी की प्रेम कहानी या चित्रपटात परत धमाल करत आहे. या चित्रपटाचे टीजरला बॉलीवूडचे बादशाह शाहरुख खान द्वाराही खूप शाब्बासी भेटली आहे. शाहरुख खान नि ट्विटरवर चित्रपटाचे खूप गुण गायले आणि चित्रपटाच्या टीमला बधाई दिली. हा चित्रपट लवकरच 28 जुलै 2023 ला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.

चित्रपटांची प्रदर्शित & ओटीटी अपडेट

चित्रपटाचे नाव रॉकी और रानी की प्रेम कहानी
OTT प्लॅटफॉर्म ऍमेझॉन प्राइम व्हिडिओ
OTT प्रदर्शित टीबीए
प्रदर्शित तारीख 28 एप्रिल 2023
दिग्दर्शक करण जोहर
इंग्रजी हिंदी
तारांकित धर्मेंद्र, जया बच्चन, शबाना आझमी, रणवीर सिंग आणि आलिया भट्ट.
सिनेमॅटोग्राफी मानुष नंदन
संगीत दिग्दर्शक प्रीतम
संपादक NA
चित्रपट उद्योग बॉलीवूड
CBFC U\A
शैली कॉमेडी, ड्रामा, प्रणय
बजेट टीबीए

हा चित्रपट एक पारिवारिक नाटक आहे ज्यात तुम्हाला भरपूर हास्य आणि रोमान्स तड़का सोबत भेटणार आहे.

जाहिराती
Ads

आता काही दिवसापूर्वी दिग्दर्शक करण जोहरच्या वाढदिवसाला या चित्रपटाचे पोस्टर सादर केलते. या चित्रपटात रणवीर सिंग आणि आलिया भट चा अवतार खूप खास आहे. आपल्याला रणवीर नेहमीसारखे धमाल दिसणार आहे आणि आलिया भट वेगवेगळ्या साडीच्या लुक मध्ये खूप उत्कृष्ट दिसत आहे.

चित्रपटाचा ट्रेलर रिव्ह्यू

प्रेक्षकांनीही या चित्रपटाची भूमिकाला भरभरून प्रेम दिले, फॅन्स चित्रपटाचे चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यासाठी खूप आतुरतेने वाट पाहत आहे, परंतु सूत्रांचे अनुसार कळतंय की चित्रपटाची कथा प्रदर्शित होण्यापूर्वीच लीक झाली आहे. यामुळे चित्रपटाच्या टीमला खूप अडथळाचा सामना करावा लागत आहे. कलाकार आणि दिग्दर्शक सगळेच खूप धक्क्यात आहे.

कोणीतरी चित्रपटाची सर्व कहाणी चा कथन पहिलेच प्रेक्षकांमध्ये कळवला आहे, यूजर द्वारा चित्रपटाचे बॅकग्राऊंड दिल्लीचे आहे असे सांगितलं गेले आहे. रणवीर सिंग अशा पात्राची भूमिका करत आहे ज्याला पैसे उडवायला आवडते आणि दुसरीकडे आलिया भट चित्रपटात खूप इमानदार बंगाली मुलगी दाखवली आहे. प्रेक्षक चित्रपटाची कथा लिक होण्याच्या कथनवर खूप चेष्टा करत आहे, काही फॅन्सच्या मतेने ही कहाणी तू झुटी मे मक्का या चित्रपटासारखी आहे.

नवीन कलाकारांना मिळणारं संधी

रॉकी और रानी की प्रेम कहाणी
Rocky Aur Rani Ki Prem Kahaani Movie

या चित्रपटात आपल्याला काही नवीन टॉप टीव्ही कलाकार ही दिसणार आहे, या वेळेस करण जोहरने डेली सोप चे कलाकार निवडले आहे. अर्जुन बिजलानी,श्रीति झा आणि श्रद्धा आर्या सारखे नामी टीव्ही कलाकार या चित्रपटात दिसणार आहे. याच्या व्यतिरिक्त या चित्रपटात शबाना आजमी, धर्मेंद्र आणि जया बच्चन पण प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन करण जोहर ने केले असल्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटाकडून भरपूर उच्च अपेक्षा आहे आणि सोबतच आलिया भट आणि रणवीर सिंग सारखे बॉलीवूडचे उच्च कलाकार मुख्य भूमिकेत आहे.

वायकॉम ची ही निर्मिती..

हा चित्रपट धर्मा प्रोडक्शन आणि वाय कॉम एटीन स्टुडिओ द्वारा बनवला आहे. या चित्रपटात आलिया आणि रणवीर च्या व्यतिरिक्त शबाना आजमी, जया बच्चन आणि धर्मेंद्र, छोट्या रोल मध्ये सारा अली खान प्रीटी झिंटा पण प्रदर्शित होत आहे. हे बघून वाटतं की या चित्रपटात भरपूर नामी कलाकार भरलेले आहे, म्हणून चित्रपट नक्कीच धमाल दिसतोय. या चित्रपटाची घोषणा जुलै 2021 ला केली गेली होती. या चित्रपटाची सुरुवात ऑगस्ट 2021 ला केली होती आणि मार्च 2023 ला संपूर्ण झाली. चित्रपटाचे चित्रीकरण समाप्ती वर आलिया भट चे ‘चन्ना मेरेया’ या गाण्यावर नृत्य करताना प्रदर्शन झाले होते. या चित्रपटाचे चित्रीकरण मुंबई, नवी दिल्ली, रुस आणि जम्मू कश्मीर मध्ये केले आहे. या चित्रपटाचे संगीत प्रीतम द्वारा दिले आहे.

अशी गेली चित्रपटाची तारीख पुढे..

रॉकी और राणी की प्रेम कहानी हा चित्रपट दहा फेब्रुवारी 2023 ला प्रदर्शित होणार होता परंतु ओमीक्रोन कोरोना महामारीमुळे चित्रपटाची तारीख पुढे केली गेली. करण जोहरने या चित्रपटाचे स्वागत करताना इंस्टाग्राम वर चित्रपटाचे पहिले पोस्टर सादर केले आणि चित्रपटाचे प्रदर्शनाची तारीख ची घोषणा केली. पोस्टर खाली करण जोहर द्वारा लिहिले गेले की “सात वर्षानंतर मी आपल्या चित्रपटगृहात परत येत आहे, या चित्रपटाच्या माध्यमातून मला भरपूर सारे अप्रतिम कलाकार भेटले या चित्रपटाचे संगीत खूप मधुर आहे आणि तुमच्या हृदयाला खूप आवडणार आहे, हा चित्रपट पारंपारिक गोष्टींवर आधारित आहे. आता चित्रपट लवकरच 28 जुलैला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे”.

तब्बल 7 वर्षानंतर दिग्दर्शन पदावर आला..

‘ए दिल है मुश्किल’ या चित्रपटाच्या सात वर्षानंतर करण जोहर हा दिग्दर्शन पदावर परतला आहे. यावेळेस करण जोहर आपल्यासाठी खूप उत्कृष्ट  चित्रपटाची भेट घेऊन आला आहे. बॉलीवूडच्या टिपिकल लव स्टोरी सारखं या चित्रपटात पण आपल्याला आलिया भट थंडगार हवेत साडी घालून रणवीर सिंग सह रोमान्स करत दिसणार आहे. टीजर मध्ये आलिया भट दुर्गा माता चे आरती करत दिसत आहे यांनी हे कळते की आलिया भट एक बंगाली मुलीचा पात्र करत आहे. टीजर मध्ये आलिया गाण्यावर फिरकत आहे तर कधी भांडत रडतही आहे. आलिया रणवीर च्या जोडीमध्ये करण जोहरच्या रोमान्स तडका पाहणं खूप धमाल असेल. चित्रपाटाचे गाणे ‘तुम क्या मिले’ पण कानांना खूप मधुरता प्रदान करते.

हे पण पहा: लवकर येणारे टॉप 10 बॉलिवूड चित्रपट | Upcoming Bollywood Movies 2023 & 2024

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत