जाहिराती बंद x
Marathi Movies

शिवरायांचा छावा मराठी चित्रपट | Shivrayancha Chhava Marathi Movie 2024

×

शिवरायांचा छावा मराठी चित्रपट | Shivrayancha Chhava Marathi Movie 2024

Share this article

नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला मराठी चित्रपटाबद्दल माहिती सांगणार आहे, मित्रांनो या अगोदर सुभेदार, पावनखिंड , शेर शिवराज, फर्जंद आणि फतेशिकस्त नंतर दिगपाल लांजेकर यांनी नवीन चित्रपटाची घोषणा केली, आणि या चित्रपटाचे पोस्टर आणि टिझर नुकतीच एव्हरेस्ट मराठी यूट्यूब चॅनल रिलिज झाला आहे. तरी प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे तरी या विडिओला लाखात व्ह्यू मिळाले. तर मित्रांनो या चित्रपटांचे अपडेट्स देणार आहे मी. मित्रांनो माझा राहुल पवार आज या ब्लॉगचे प्रस्तुत कर्ते Atishmkv हि वेबसाईट आहे.

शिवरायांचा छावा हे एक आकर्षक ऐतिहासिक ड्रामा चित्रपट म्हणून लवकरच भेटीला येणार आहे, जे छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रमी उत्तराधिकारी छत्रपती संभाजी महाराजांच्या उत्कट कथेत प्रेक्षकांना लवकरच उत्सुकता करून टाकते. ऐतिहासिक तपशिलांकडे बारकाईने लक्ष देऊन, हा चित्रपट संभाजी महाराजांच्या काळातील आव्हानांना नॅव्हिगेट करत त्यांच्या उल्लेखनीय प्रवासाला जिवंत करतो. ‘शिवरायांचा छावा’ या योद्धा राजाच्या वारसाचा शोध घेणारे मनमोहक कथन हे मराठा साम्राज्याच्या समृद्ध इतिहासाला सिनेमॅटिक भाग्य लाभले आहे.

जाहिराती
Ads
चित्रपटाचे नाव शिवरायांचा छावा
शैली ऐतिहासिक चित्रपट
दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर
निर्माते वैभव भोर किशोर पाटकर
संगीत दिग्दर्शक देवदत्त मनीषा बाजी
लीड कास्ट

मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, भूषण पाटील, तृप्ती तोरडमल, प्रसन्न केतकर, अभिजीत श्वेताचंद्र, विक्रम गायकवाड, भूषण शिवतारे, अमित देशमुख, अवधूत गांधी, रवी काळे, राहुल देव, ज्ञानेश वाडेकर, ईशा केसकर, नंदिनी कान्हेरे, समीर धर्माधिकारी, दिप्ती लेले, सौरभ कुशवाह, बिपीन सुर्वे, आशुतोष वाडेकर, दादा पासलकर सागर संत, शरद सिंह, राम आवणा, रणजित रणदिवे, नींता टिपणीस दोंदे, अमित मेहता, सायली सांभारे

प्रकाशन तारीख १६ फेब्रुवारी २०२४ (भारत)
चित्रपटाचे बजेट 10 कोटी (अंदाज)
बॉक्स ऑफिस कलेक्शन NA Cr. अंदाजे (जगभरात)
रेटिंग

शिवरायांचा छावा’ नववर्षात म्हणजेच १६ फेब्रुवारी २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. संभाजी महाराजांच्या धगधगत्या अजेय पराक्रमाची कथा दिग्पाल लांजेकरांनी लिहिली असून, पटकथा-संवाद आणि गाणी देखील त्यांचीच आहेत. या गाण्यांना साजेसे संगीत युवा संगीतकार देवदत्त मनीषा बाजी यांनी दिले आहे. तर, पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे.

छत्रपती संभाजी महाराज म्हणजे असामान्य पराक्रमांचे अधिपतीच. इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरांत कोरलं गेलेलं स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचं अवघं आयुष्य एक धगधगतं अग्निकुंड म्हणावं लागेल.

मोठ्या पडद्यावर संभाजी महाराजांचा जीवनपट उलगडण्याचं शिवधनुष्य दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी उचललं आणि तेव्हापासून एकच चर्चा रंगली ती म्हणजे ‘शिवरायांचा छावा’ साकारणार कोण..?

या तेजस्वी, धाडसी, शस्त्रशास्त्र पारंगत शंभूराजांची भूमिका रुपेरी पडद्यावर साकारायची चालून आलेली सुवर्णसंधी कोणत्या कलाकाराला मिळणार हे लवकरच आपल्या समोर येणार आहे.

या तारखेला येणार शिवरायांचा छावा भेटीला

‘शिवरायांचा छावा’ या मराठी चित्रपटाच्या छायांकनाची जबाबदारी प्रियांका मयेकर यांनी सांभाळली आहे तर संकलन सागर शिंदे यांचे आहे. सिनेमात चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी हे कलाकार झळकणार आहेत.

चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी ए. ए . फिल्म्स सांभाळत आहे. नववर्षात म्हणजेच १६ फेब्रुवारी २०२४ ला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे

शिवरायांचा छावा चित्रपटांचे कलाकार | Shivrayancha Chhava Cast

या चित्रपटांत तुम्हाला प्रमुख भूमिकामध्ये संभाजी महाराजांच्या रुपात भूषण पाटील, आणि छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या रुपात चिन्मय मांडलेकर आणि राजमाता जिजाबाई यांच्या भूमिकेत मृणाल कुलकर्णी पाहायला मिळणार आहे.

 चित्रपटाचे टीझर

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत